UPSC मी आणि तुम्ही : मनोगत












मनोगत


  ...अन्सार शेख



आपल्या आयुष्यातील काही तारखा आपण कधीच विसरू शकत नाही. जसे, आपला । बाढदिवस, पालकांचा वाढदिवस शाळेतील पहिला दिवस, प्रेमात पडल्याचा पहिला दिवस व तारीख, Girlfriend चा वाढदिवस (हे विसरून दाखवाच) किंवा Boytreind चा बाढदिवस. या तारखांव्यतिरिक्त आयुष्याला वळण देणाच्या प्रसंगांच्या तारखा आपण क शकत नाही. 10 में 2016 ही तारीखही माझ्या आयुष्यातील एक सर्वात महत्वाची तारीख होती. त्यादिवशी सायंकाळी 4:30 च्या सुमारास UPSC चा अंतिम निकाल लागला. उमेश नावाच्या माझ्या मित्राने मला Call करून कळवले.

 

लहानपणापासूनच अतिशय के खालेल्या व जवळजवळ सर्वच प्रकारचे दैन्य भोगलेल्या माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबातील मुलासाठी माझ्या मित्राचे 'Congratulations] बार! तू पास झाला आहेस, 361 वी Rank मिळाली आहे हे शब्द डोळ्यातून नकळत अधू काढणारे होते.



मित्रांचे आभार मानून Result पुन्हा एकदा Confirm केला. UPSC च्या Website वर 'ती' Sacred PDF Upload झाली होती आणि त्या यादीत माझा 361 वा क्रमांक होता. काय करू, कम React करू, ते कळतच नव्हते. 2010 मध्ये निर्धारित केलेल्या ध्येयाची पूर्ती यादिवशी झाली होती. आता सगळं ठीक होणार होतं. आयुष्यभर गरिबीचे, दारिद्र्याचे व दैन्याचे चटके सहन केलेल्या माझ्या पालकांना समाजात किमान आतातरी आदराची वागणूक मिळणार होती.

 

भरून आलेले डोळे पुसत, वडिलांना Call केला. माझे वडील तेव्हाही रिक्षा चालवत होते. रिक्षाच्या व इतर गाड्यांच्या आवाजामुळे “अब्बा, मैं कलेक्टर बन गया" हे त्यांना ऐकायला आले नाही. "पहुंचने के बाद फोन करता" असं म्हणत त्यांनी Phone ठेवला. त्यानंतर भाऊ, दीदी, शिक्षक या सर्वांना बातमी कळवली. पाय जमिनीवरच होते, पण आनंद गगनात मावेनासा झाला होता.

 

Result नंतर अर्ध्या तासातच अनेक लोकांचे Phone सुरू झाले. एक Call Receive करून बोलेपर्यंत 15 ते 20 Missed Calls पडायचे. माझ्या 21 वर्षांच्या एकंदर आयुष्यातही जेवढे Calls आले नसतील, तेवढे त्या एका दिवसात आले होते आणि हे 15 दिवस सतत सुरू होते). Result नंतर मीडियाचा भडिमार सुरू झाला. माझ्या आयुष्यात मीडिया हाताळण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे पहिल्यांदाच Media चा चांगला आणि वाईटही अनुभव आला. या गडबडीत मला पुणे सोडून घरीही जाता आले नाही. शेवटी 13 मे रोजी गावात पोहोचलोच, गावात माझा जंगी सत्कार झाला. गावाच्या इतिहासात कदाचितच एवढी गर्दी झाली असेल, ही गर्दी बघून मीही खूप घाबरलो होतो. गावातून संध्याकाळी मोठी र काढण्या मिरवणुकीत गावातील शेजारील गावातील गावकरी नेते, महिला असे सर्व क्षेत्रातील सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने सामील झाले होते. मिरवणुकीच्या वेळी घरासमोर उभे राहून माझ्या अभिवा डोळ्यांनी प्रतिसाद देणान्या महिलांचे आनंदाबू मलाही भावुक करत होते,

 

माझ्या निकालाची बातमी महाराष्ट्रभर पसरली होती. यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळावी म्हणून ठिकाणावरून कार्यक्रमांसाठी निमंत्रणे येऊ लागली, बेळेचा मोठा अभाव असतानाही मी 75 दिवसांत 50 पेक्षाही जास्त Programmes attend केले. या कार्यक्रमांत मी सविस्तरपणे माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर व परीक्षांच्या तयारीवर बोललो.



जे प्रेम व आदर मला कधीच मिळाला नव्हता, तो या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळत होता. या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होत असे. काही विद्यार्थी व पालक सभागृहात जागा मिळाली नाही म्हणून नाराजही होत. परंतु सभागृहाच्या बाहेर कसेबसे Speakers लावून त्यांची किमान ऐकण्याची सोय होत असे. माझे भाषण झाल्यानंतरचा काहीवेळ विद्याथ्र्यांच्या प्रश्नोत्तरांसाठी दिलेला असायचा. शक्य तेवढ्या प्रश्नांची

 

उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करत होतो, पण प्रश्न संपत नव्हते. याच प्रश्नांच्या भडिमाराने मला UPSC च्या माझ्या तयारीविषयी इतरांना फायद्याचे व मार्गदर्शक ठरेल, असे एक पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली. परंतु त्यासाठी वेळ लागणार होता. म्हणून Facebook वर एक Page तयार केले. या पेजवर जसा जसा वेळ मिळेल तसातसा मी विद्याथ्र्यासाठी Posts टाकत होतो, सध्याही टाकतो. तसेच दररोज येणाऱ्या शेकडो Messages ला Reply केला. मात्र प्रत्येकाला Reply देणं शक्य नव्हते. याशिवाय जवळजवळ सर्वांचे प्रश्न एकसारखेच होते. काही प्रश्न अतिशय चांगले असत तर काही प्रश्न विचित्र अर्थहीन आणि त्रासदायक होते. परंतु माझेही प्रश्न 3 वर्षांपूर्वी असेच होते. या सर्व प्रश्नांना मी या पुस्तकात उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्याथ्र्यांच्या सातत्यपूर्ण प्रश्नांनी पुस्तक लिहिण्याच्या माझ्या निर्धाराला अधिकच प्रेरणा दिली. तयारी कशी करावी, याऐवजी 'तुमच्या जीवनावर आत्मचरित्र लिहा' असाही सल्ला अनेक लोकांनी दिला. माझ्याही मनात काही काळ हा विचार होता. मात्र दोन कारणांमुळे मी आत्मचरित्र लिहिण्याचा विचार सोडला. एक म्हणजे आत्मचरित्र वाचून विद्यार्थ्यांना मीही IAS होऊ शकतो ही प्रेरणा मिळेल, मात्र मी IAS कसा होऊ' हे समजणार नाही. म्हणजे आत्मचरित्र लिहिण्यासाठी मी अजूनही पात्र नाही असे मला प्रामाणिकपणे जाणवले. 10-15 वर्षांची Service झाल्यानंतर कदाचित मी आत्मचरित्र लिहू शकेन. हे पुस्तक लिहिण्यामागे दुसरीही एक प्रेरणा होती. माझा तयारीचा कालखंड अतिशय खडतर होता. माझ्या



ध्येयपूर्तीच्या मार्गात गरिबीबरोबरच मार्गदर्शनाचा अभावही अनेक अडथळे आणत होता. 12 वीपर्यंत मला UPSC चा फक्त Long Form माहीत होता. पुण्यात आल्यानंतर मी FYBA ला असताना कोणीतरी UPSC ची तयारी करत आहे, असं ऐकलं की त्यांच्याजवळ बसून काहीतरी मार्गदर्शन मिळण्याची आशा बाळगत होतो. मात्र अशी मदत करणारा कोणीही मिळाला नाही. याला विनय सोनवणे (विनय दादा) हा अपवाद होता. तो Fergusson मध्ये मला दोन वर्षांनी Senior होता. माझ्या एका Classmate ने त्याच्याशी माझी ओळख करून दिली. त्याच्याकडूनच मला पहिल्यांदा UPSC ची Booklist मिळाली.

 

त्यानंतर SYBA ला असताना Class Join फैला (मात्र Class स्याही काही मर्यादा असतात. त्यामुळे असंख्य प्रश्न अनुत्तरित होते). 2014-15 मधील यशस्वी उमेदवारांचे कार्यक्रम Attend केले. त्यातून प्रेरणा मिळाली मात्र मार्ग नाही. त्यांच्याशी नंतर संपर्कही झाला नाही. मित्रांशी चर्चा करून Group Study सुरू केला. तरीही माझ्या चुका काढण्यासाठी खूप कमी लोक होते. शेवटी चुकांतूनच आपण शिकू या' असे म्हणत Trial and Error Method चा स्वीकार करावा लागला. मात्र पूर्वपरीक्षेनंतर मिळालेल्या 100 दिवसात जे नियोजन केले, युनिकमधील सर्व विषयांच्या शिक्षकांकडून जो 'चिकित्सक Feedback मिळाला आणि त्यावर जी मेहनत घेतली त्यातून अनेक चुकांवर (संभाव्य) मात करता आली. परिणामी पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचे स्वप्न साकार झाले,

 

मी माझ्या तयारीत असंख्य चुका केल्या. माझा हात धरून या चुका सुधारणार कोणी सुरुवातीला मिळाल असतं तर कदाचित माझा Rank बाढलाही असता; मात्र आहे ती परिस्थिती स्वीकारून पुढचा प्रवास सुरु करतोय. आणि याचवेळी ज्या मार्गदर्शनाचा तुटवडा मला प्रारंभी होता, जे मार्गदर्शन प्रारंभी मला मिळाले नाही, ते किमान तुम्हाला तरी मिळावे म्हणून हे पुस्तक लिहीत आहे.

 

हे पुस्तक लिहिण्यासाठी बेळेचा खूप अभाव होता. प्रशिक्षणासाठी LBSNAA Join फेलं. तेथे सकाळी 6 ते संध्याकाळी 6-7 पर्यंतचे Schedule खूप Busy असते. 6-7 नंतर जो काही 1-2 तासांचा वेळ मिळत असे. त्या वेळेत मी हे लिखाण पूर्ण केले. काही गोष्टी record करून संजय माने या माझ्या मित्राकडे पाठवल्या. त्याने माझे Recorded शब्द लिखाणात उतरवले. रविवारी साधारणपणे सुट्टी असते, पण ही सुट्टी मी हे पुस्तक लिहिण्यासाठी वापरली. 31 डिसेंबरला या पुस्तकाची पहिली Copy मला मिळाली. त्यात अनेक गोष्टी Add करावयाच्या होत्या, Title ठरवायचे होते आणि बऱ्याच चुका दुरुस्त करावयाच्या होत्या. मात्र 6 जानेवारी 2017 ला 'भारत दर्शन' सुरू होणार होत. त्यानंतर दीड महिना वेळ मिळणार नव्हता. म्हणून जसाजसा वेळ मिळेल तसातसा मी सुधारणा करत गेलो आणि अंतिमतः हे पुस्तक पूर्ण झाले. मात्र वेळेअभावी काही घटकांवर काही अंशी दुर्लक्ष झाले, त्याबद्दल येथेच दिलगिरी व्यक्त करतो.

 

अर्थात असे असतानाही या पुस्तकाला अधिकाधिक विस्तृत समावेशक व वाचनीय करण्याचा प्रयत्न केला आहे. UPSC च्या तयारीतील जवळजवळ सर्वच घटक यात Cover केले आहेत. नुकतीच 12 वी परीक्षा पास झालेल्या व UPSC ची तयारी करू इच्छिणाऱ्या मात्र UPSC चा Long Form बगळता इतर काही माहिती नसणान्या विद्यार्थ्याला समोर ठेवून हे पुस्तक लिहिले आहे. थोडक्यात, 'UPSC म्हणजे काय? इथपासून 'Training मध्ये काय काय असतं इथपर्यंत सगळं या पुस्तकात Cover केलं आहे.

 

पुस्तकाची भाषा जाणीवपूर्वक साधी, सरळ व सोपी ठेवली आहे. पुस्तक वाचताना मी तुमच्यासमोर बसून बोलत आहे असे वाटावे, याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. व्याकरणाचे नियमही जाणीवपूर्वक टाळले आहेत. पुस्तकाची भाषा ही शुद्ध मराठी नसून 'मिंग्लिश आहे, असे म्हणता येईल. बऱ्याच वाक्यांमध्ये इंग्रजी शब्द वापरले आहेत, मात्र ही इंग्रजी 'आपलीवाली' इंग्रजी आहे, म्हणजे फारशी अवघड नाही. (अर्थात माझी खरीखुरी मराठी तपासण्यासाठी याच पुस्तकात Add केलेली माझी उत्तरे बघा.)

 

आता पुस्तकाचे नामकरण रावयाचे होते. नाव कोणते ठेवावे यासाठी बरेच प्रयोग केले. मित्रमैत्रिणींना विचारले, शिक्षकांचा सल्ला घेतला, फेसबुकवरही 200 पेक्षा जास्त नावे सुचवली गेली. जसे 'हो, हे शक्य

 

आहे', 'राजमार्ग', 'IAS@21', 'चला अधिकारी होऊया' इत्यादी. ही नावे चांगली असली तरी आम्हाला काय बुबा ती पटत नाहीत. जी पटली ती यापूर्वीच कोणीतरी वापरून झाली होती आणि एकदाचा डोक् प्रकाश (किंवा रोशनी म्हणा) पडला आणि 'UPSC मी आणि तुम्ही हे सटीक व साधे सरळ देण्याचा निर्णय घेतला. या पुस्तकात UPSC ची A, B, C, D ब Y Z पर्यंत सर्व काही समाविष्ट केले आहे. माझ्या मते लेखकाचे (माझेच) मनोगत जरा लांबत चालले आहे. आता मनोगताचा समारोप करणे गरजेच आहे. मात्र हे पुस्तक आकारास येण्यासाठी माझ्याव्यतिरिक्त ज्या व्यक्तींनी मोलाचे योगदान दिले आहे, त्यांचे आभार मानणे मला आवश्यक वाटते.

 

सर्वप्रथम या पुस्तकाचा बराचसा Recorded Content कागदावर उमटवण्याचे मोलाचे काम करणाऱ्या

 

माझ्या संजय माने या मित्राचे मी खूप खूप आभार मानतो. याचबरोबर शुभम व्हटकर, विक्रांत मोरकर, मनोज व्हटकर, महेश व्हटकर, संतोष कामठे, सादिक शेख, नवाज पटेल, विनय सोनवणे आणि मुकुंद होन या माझ्या सर्व जीवलग मित्रांचेही त्यांच्या पावलोपावली मिळणाऱ्या सहकार्यासाठी आभार मानतो. The Unique Academy चे श्री. तुकाराम जाधव सर व मल्हार पाटील सर यांचेही मी मनस्वी आभार मानतो. माझी पुस्तकाची कल्पना ऐकताच साहाय्य पुरवण्याचे, पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे व इतर बाबतीत पाहिजे ते सहकार्य करण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले.

 

याशिवाय भारत पाटील सर यांनीही या पुस्तकाच्या संरचनेसंदर्भात मोलाची मदत केली. त्यांचेही मी मनापासून आभार मानतो, याव्यतिरिक्त Unique मधील त्या सर्वांचे मी आभार मानतो, ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या पुस्तकाच्या निर्मितीस आपले योगदान दिले आहे.

 

याचबरोबर या पुस्तकातील काही घटकांवर मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल नवनाथ गव्हाणे (IAS), आदिती बाळूंज (IFS), अमित तोलानी (IPS), रोहन बोत्रे (IPS), अमृता दुहान (IPS), शीतल बाली (IRAS), अमृता बॅनर्जी (IFS), अलंक्रिता पांडे (IAS), श्वेता अगरवाल (IAS), श्रीकृष्णनाथ पांचाळ (IAS), सिद्धेश्वर) बॉडर (IAS), जतीन लाल (IAS), बिनय लांगे (IAS) या माझ्या सर्व सहकारी मित्रांचे मी आभार मानतो.

 

तुम्हा सर्वांच्या भावी वाटचालीस व उज्ज्वल भविष्यासाठी अनंत शुभेच्छा !

 
UPSC मी आणि तुम्ही : मनोगत UPSC मी आणि तुम्ही : मनोगत Reviewed by Aslam Ansari on June 08, 2021 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.