UPSC मराठी माध्यमातून देऊ शकतो का?

 UPSC मराठी माध्यमातून देऊ शकतो का? दिली तर कसं देऊ? मराठी भाषेचे महत्व असतो का ? असे अनेक प्रश्नांचे उत्तर:



 

UPSC देशातील टॉप टेन आवघड परीक्षेमधून एक आहे. सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात की आपण यूपीएससी कोणकोणत्या भाषांमधून देऊ शकतो. चला बघूया याचे उत्तर .

 

आपण सगळे महाराष्ट्रात राहतो, आपल्या इकडं यूपीएससीच्या फार जास्त क्लासेस नसतं त्यामुळे गावातल्या विद्यार्थ्यांना यु पी एस सी बद्दल मनामध्ये शंकाच राहतात की यूपीएससी आपण मराठी माध्यमातून देऊ शकतो का असे कित्येक विद्यार्थी असतात त्यांना असे प्रश्न पडतात, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून कितीक व्हिडिओ  बघितलेल्या आहे, पण आपल्याला याचे उत्तर फार्स परवडणारे नाही. तर चला बघूया आपण यूपीएससी कोणत्या भाषेतून देऊ शकतो. 

 

यु पी एस सी मध्ये तीन टप्पे असतात 



  1. पूर्व परीक्षा ( Prelims )

  2. मुख्य परीक्षा ( mains )

  3. मुलाखत ( Interview )  


 


1.  पूर्व परीक्षा : पूर्व परीक्षेमध्ये क्वेश्चन पेपर इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेमध्ये असतात. पूर्व परीक्षा मल्टिपल चॉइस क्वेश्चन ( चार पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा ) म्हणजे चार पर्याय दिलेले असतात आपल्याला त्यातून एक पर्याय निवडायचा असतो म्हणजे इथं मराठी भाषा नसते फक्त ठीक करायचा असल्यामुळे मराठी भाषेचा संबंध कुठे येत नाही. 

 

2. मुख्य परीक्षा : मुख्य परीक्षेचे प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी दोन भाषांमध्ये असते. डिटेल एप्लीकेशन फॉर्म ( DAF ) भरत्या वेळेस आपण मराठी भाषा सिलेक्ट केलेली असेल तर आपण उत्तर मराठी मध्ये लिहू शकता.

 

 ( लक्षात ठेवा प्रश्नपत्रिका दोनच भाषांमध्ये  छापलेले असतात हिंदी आणि इंग्रजी, फक्त उत्तर मराठी भाषेतून लिहू शकतो ) 

 

मुख्य परीक्षेमध्ये नऊ पेपर असता 

 

1) इंग्रजी (300 मार्क )

 

2) भारतीय भाषांपैकी एक ( संविधान की आठवी अनुसूची) (300 मार्क )

 

3) निबंध (250 मार्क )

 

4) सामान्य अध्ययन 1 ( 250 मार्क )

 

5) सामान्य अध्ययन 2 ( 250 मार्क )

 

6) सामान्य अध्ययन 3 ( 250 मार्क )

 

7) सामान्य अध्ययन 4 ( 250 मार्क )

 

8) वैकल्पिक विषय 5  ( 250 मार्क ) 

 

9) वैकल्पिक विषय 2  ( 250 मार्क )

 

 

 


 

3) मुलाखात : मुलाखात आपण मराठी भाषेमधून देऊ शकतो. मुलाखत मराठी भाषेतून देताना ट्रान्सलेटर असतो, ते ट्रान्सलेटर आपण जे काही बोललो ते ट्रान्सलेट करून त्यांच्यापर्यंत आपली भावना किंवा आपले मत पोहोचू शकतो. 

 

 

आमचे मत 

 

( इंटरव्यू शक्यतो इंग्रजी किंवा Hindi भाषेतून दिले पाहिजे. कारण आपली भावना किंवा आपले मत जे एक्स्प्रेशन से ते त्यांच्यापर्यंत डायरेक होऊ शकत नाही त्यामुळे इंटरव्यू शक्यतो हिंदी किंवा इंग्रजी मध्ये दिले पाहिजे)

 


UPSC मराठी माध्यमातून देऊ शकतो का? UPSC मराठी माध्यमातून देऊ शकतो का? Reviewed by Aslam Ansari on June 09, 2021 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.