2nd CHAPTER : युपीएससी काय ?



 युपीएससी काय ?

उतावळा Aspirant, गुडघ्याला बाशिंग

यूपीएससी का करायची हे एकदा ठरल्यानंतर आता आपण या परीक्षेचे नेमके स्वरूप माहिती करून घेणे आवश्यक आहे. कुठलीही गोष्ट करताना अथवा परीक्षा देताना आपल्याला व्यवस्थित ओळख असली पाहिजे. त्यामुळे आपण युपीएससीची बाराखडी जाणून घेवूयात. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना UPSC में Basics माहीत असतील, काहींनी तर 2-3 तयारीदेखील केली असेल. पण तरीही मी असे गृहीत धरतो की तुमच्यापैकी प्रत्येकजणZaro पासून सुरुवात आहे. त्यामुळे मी Basics पासूनच तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे अगदी पेन कोणता निवडायचा ते Interview पर्यंत


UPSC म्हणजेच Union Public Service Commission अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग, या आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेद्वारे केंद्रीय सेवांमधील अधिकारी निवडले जातात. उदा. IAS, IPS, IRS, etc. अशी जवळ जवळ 27-28 वेगवेगळी पदे दरवर्षी भरली जातात. त्यासाठी UPSC दरवर्षी परीक्षा घेत असते. ही परीक्षा पूर्व मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये होते.


पहिला टप्पा Prelims म्हणजे पूर्व परीक्षेचा असतो. याआधी पूर्व परीक्षा साधारणपणे ऑगस्टमध्ये व्हायची, आता ती जूनपासून सुरू होणार आहे. MCO पद्धतीचे म्हणजे बहुपर्यायी प्रश्न पूर्व परीक्षेत विचारले जातात. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारलेला असतो आणि त्या प्रश्नाखाली चार पर्याय असतात त्यापैकी योग्य पर्यावाची निवड तुम्हाला करायची असते. असे दोन पेपर असतात पहिला पेपर GS-I म्हणजे सामान्य अध्ययन एक तर दुसरा पेपर सामान्य अध्ययन दोन CSAT म्हणजे Civil Services Aptitude Test अर्थात नागरी सेवा कल चाचणीचा असतो. पाला नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking) असते. बरेचजण तुके बहादुर असतात. त्यांना उत्तर माहीत नसत पण काहीतरी तुके लावून येतात. पूर्वी असे बहादुर पासदेखील व्हायचे. म्हणून आता निगेटिव्ह मार्किंग पद्धत सुरू झालेली आहे. म्हणजेच जर तुम्ही तीन प्रश्नांची उत्तरे चुकीची दिलीत तर तुमच्या एका अचूक उत्तराचे मार्क्स बजा होतात. शिवाय पूर्व परीक्षा ही मराठीमध्ये नसते. प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदीमध्ये असते. एकीकडे इंग्लिशमध्ये छापलेलं असतं तर दुसऱ्या बाजूला त्याचं हिंदी भाषांतर छापलेल असत. तुम्हाला या दोन्ही भाषांपैकी जे जमतं ते तुम्ही सोडवण गरजेचं आहे.

GS- या पेपरमध्ये History, Geography, Pol. Science. Environment, Economics, Current Affairs, Science & Techmology असे Topics असतात. या पेपरमध्ये 100 प्रश्न आणि 200 मार्क्स आहेत. शिवाय GS-1 चे मार्क्स हे तुमच्या Merit मध्ये Count होतात. म्हणजे यात तुम्हाला जेवढे मार्क्स पडतील त्या मार्क्सवरती तुमचं भविष्य (Mains ) ठरत असत. उदा. आमच्या वेळी Pre साठी ओपनचा Cutt 106 होता, म्हणजे 200 पैकी ज्यांना 105.5 मार्क्स आले वे लोक Quality होणार नाहीत, पण ज्यांना 106 किंवा त्यापेक्षा जास्त Marks आहेत ते लोक पूर्व परीक्षा पास होणार होते. दुसऱ्या म्हणजे CSAT च्या पेपरमध्ये साधारणपणे English Comprehension Passages, Mathematics (Time, Speed, Work, Permutations & Combinations, Percentages, Averages, Clock) आणि Logical Reasoning यामध्ये Syllogism, Seating arrangement, Blood relations इ. गोष्टी असतात. यामध्ये 80 प्रश्न असतात. एका प्रश्नाला 23 मार्क्स असतात. एकूण 200 माक्र्क्सचा पेपर असतो. मात्र हा Qualifying पेपर आहे. याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला जर पूर्व परीक्षा पास करायची असेल तर दुसन्या पेपरमध्ये तुम्हाला 200 पैकी 200 मिळून उपयोग नाही, त्यांनी Qualifying चा अर्थ असा दिलेला आहे की, तुम्हाला त्या पेपरमध्ये फक्त 33% मार्क्स पाडायचे आहेत. म्हणजेच 200 पैकी 66 मार्क्स पडणं गरजेचं आहे. पास होण्यासाठी दोन्ही पेपरचे माक्र्स ग्राह्य न धरता पहिल्या पेपरमध्ये जो Score आहे त्याच्यावरच तुमचं मेरिट ठरणार आहे. तुम्ही 200 पैकी 200 मिळवले आणि 200 पैकी 66 मिळवले तरी तुमचे Status Same राहणार आहे. म्हणजे यामध्ये जास्त मार्क्स पाहून फायदा नाहीए. (म्हणजे पाडले. पाहिजेत) पण पाडून काही फायदा होणार नाहीए. 


 Mains म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये एकूण 9 पेपर्स असतात. सर्व 9 पेपर्स Descriptive म्हणजे वर्णनात्मक आहेत. त्यामुळे मुख्य परीक्षेला 'लिखाणाची परीक्षा' म्हटले जाते. यामध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर 100-200 शब्दांत लिहिणं अपेक्षित असतं. (जी कोणती भाषा निवडाल त्यामध्ये) इथे निगेटिव्ह मार्किंग नाही. प्रश्नपत्रिका फक्त हिंदी व इंग्रजीमध्ये छापलेली असते. मात्र मराठी माध्यम निवडलं असल्यास मराठीतून उत्तरे लिहिता येतात. प्रश्न हिंदी अथवा इंग्रजीमध्ये वाचून ती समजून घेऊन आपण निवडलेल्या भाषेतून उत्तर लिहावं लागतं. परीक्षेच्या माध्यमासाठी एकूण 22 Scheduled Languages आहेत (8th Schedule of Constitution). त्यापैकी मराठी एक आहे. त्यामुळे आपण मराठीत मुख्य परीक्षा देऊ शकतो.


(भाषा वगळता) मुख्य परीक्षेतील सर्वच्या सर्व पेपर्स हे 250 मार्क्सचे आहेत. 250x7 1750 माक्र्सची ही परीक्षा आहे. याशिवाय 1) Compulsory English 2) Schedule Language हे दोन पेपर्स प्रत्येकी 300 मार्क्सचे असतात. हे दोन पेपर्स Qualifying आहेत. याचा अर्थ असा होतो की या पेपर्समध्ये कितीही Score केला तरी फायदा नाहीए (CSAT प्रमाणे). या पेपर्समध्ये तुम्हाला 25% Score करायचा असतो. यामध्ये Essay. 1/3 करा (एक तृतीयांश सारांश), भाषांतर करा या प्रकारचे प्रश्न असतात. याचं महत्व एवढ्यासाठीच आहे की तुम्ही जर 300 पैकी 2596 (75) गुण मिळवायला अपयशी ठरला तर उरलेले जे 250 मार्क्सचे 7 पेपर्स (Total 1750) आहेत, ते पेपर्स तपासलेच जाणार नाहीत. सर्वात आधीहे दोन पेपर्स चेक होतात, या पेपर्समध्ये तुम्ही Qualify झालात (25%) तरच तुमचे पुढचे पेपर्स तपा जातात आणि तुम्ही तिथूनच मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरता. त्यामुळे हे पेपर्स फारसे अवघड नसले तरी त्यांना गांभीर्याने घेणं आवश्यक आहे.

यानंतर Essay चा एक पेपर असतो. त्यामध्ये तुम्हाला साधारणतः 8 विषयांपैकी 2 विषयांवर Enay लिहावे लागतात. प्रत्येकी 125-125 मार्क्सचे ते असतात. त्यानंतर GS-I, II, III, IV असे GS चे चार पेपर्स आहेत. त्यानंतर तुम्हाला एक वैकल्पिक विषय (Optional) घ्यावा लागतो. त्याचे दोन पेपर्स -Paper 1 & 11 दोहोंनाही प्रत्येकी 250-250 मार्क्स असतात. त्यामुळे GS-III, III, IV मिळून 1000 मार्क्स + Optional चे 500 मार्क्स + Essay चे 250 मार्क्स अशी 1750 मार्क्सची ही मुख्य परीक्षा होत असते (except Qualitying languages


मुख्य परीक्षेचा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा असतो. कारण इथे तुमचा जो काही Score असतो, तो तुमच्या Merit मध्ये Count होतो. म्हणजेच Final Merit मध्ये तुमचे Prelims चे मार्क्स गृहीत धरत नाहीत. फक्त मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या मार्क्सवरून तुमचे Merit & Ranking ठरत असते. म्हणून मुख्य परीक्षेचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे


थोडक्यात, मुख्य परीक्षेचे 1750 गुण आणि मुलाखतीचे 275 अशा एकूण 2025 गुणांवर तुमचं Final Merit & Ranking ठरत असतं. (मला 1750 पैकी 693 मार्क्स होते & Cut off होता 630 चा, तसेच मुलाखतीला मला 275 पैकी 199 गुण मिळाले होते. या एकत्रित गुणांच्या आधारे मी देशातून 361 वा आलो) तात्पर्य इथे एक-एक मार्क महत्त्वाचा अस


बऱ्याचजणांनी मला हा प्रश्न विचारलाय की, तुम्ही वयाच्या 21 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात कसे यशस्वी झालात? परंतु माझे असेही मित्र आहेत. जे पाचव्या सहाव्या प्रयत्नात यशस्वी झालेत. आमच्या सोबतचे एक अधिकारी हे त्यांच्या नवव्या प्रयत्नात यशस्वी झाले. मला त्यांच्या अपयशाचं कारण तर माहीत नाही, मात्र मी तुम्हाला माझ्या यशाचं कारण नक्की सांगू शकतो. त्यातील सर्वात पहिले कारण हे 

तुम्ही जी परीक्षा देताय ती ओळखा


ही सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर दोन वर्षे अभ्यास करणार असाल तर त्यातील अभ्यासाचा पहिला एक महिना अभ्यासक्रम समजून घेण्यात घालवणं खूप महत्त्वाचं आहे. Syllabus काय आहे


आपण एक Analogy पाहूया - इकडं आपल्याकडे सचिन तेंडुलकर आहे आणि दुसरीकडे शोएब अख्ता आहे. आता त्यांच्या Cricket ची Analogy समजून सांगतो, म्हणजे पक्क काय आहे ते समजून ये


मी यशस्वी झालो याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मी माझ्या परीक्षेला आणि परीक्षकाला ओळखल होतं. आता काय होतं - Match असते, (India v/s Plak) सचिन तेंडुलकर बॉटिंगसाठी उतरतो, तिकड शोएब अख्तर 140 ते 150 च्या स्पीडने बॉल फेकतो, सचिन त्यावर सिक्स लगावतो. आता हे स्वप्न वाटेल, कारण 150 च्या स्पीडने आपण गाडी चालवू शकत नाही (तुमच्यापैकी काही चालवतही असतील म्हणा!!) त्या स्पीडने तो बॉल फेकतोय आणि अशा बॉलवर सिक्सर लगावणं अशक्य वाटेल, मात्र हे स्वप्नवत जरी असलं तरी अशक्य नाहीए. त्याच्या मार्ग काहीतरी कारण असतं. उत्तर सोपं आहे, तेंडुलकर काय करतो तर मॅचच्या आधी शोएब अख्तरचं Analaysis (विश्लेषण) करतो. तो आधी बघतो की अख्तर काय आणि कोण आहे, तो फास्ट बॉलर आहे. की स्पिनर आहे, तो बॉलचा टप्पा कुठे टाकतोय ? चिडल्यावर त्याचा बॉल कुठे पडतो? त्याला मागच्या मॅचमध्ये सर्वात जास्त सिक्स कुणी मारले होते, कुठल्या दिशेला मारले होते, बॉलचा टप्पा कुठे पडल्यावर त्याला सिक्स मारता येऊ शकतो. तो अत्यंत आनंदी असेल तर कशा प्रकारचा बॉल फेकतो, या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण तेंडुलकर करतो आणि मग तो दुसरी गोष्ट काय करतो, तर मागची जी पाकिस्तानची ऑस्ट्रेलियासोबत मॅच झाली होती त्या मॅचमध्ये अख्तरने कसे बॉल टाकले होते याचा विचार व विश्लेषण करतो. यावरुन तेंडुलकरला एकंदरीत अनुभव येतो की हा अख्तर बॉल कसे फेकत असतो. आणि हे कळल्यानंतर त्याला नेमकेपणाने कळतं की शोएब अख्तरला आता आपल्याला कसं फेस करायचं आहे. हे (फक्त अख्तर आणि सचिनसाठी नाहीतर बाकीच्या सर्व खेळाडूंसाठी लागू पडत) सर्व विश्लेषण करून झाल्यावर, मॅचच्या आधी तो नेटमध्ये येऊन नेट प्रॅक्टीस करतो. (तो क्रिकेटचा देव जरी असला तरी त्याला माहितेय की नेट प्रॅक्टीसचं महत्व काय आहे.) यात त्याची मेहनत असते, फोकस असतो, डेडीकेशन असतं, त्याचं सातत्य असतं, संयम असतो, चिकाटी असते, जिद्द असते; हे सगळं त्याच्या सोबत असत. आणि मग विश्वासाने तो मैदानात उतरतो तेव्हा त्याच्यासमोर एकच लक्ष्य असतं येणाच्या बॉलवर मला सिक्स मारायचा आहे किंवा चांगल्या प्रकारे खेळायचं आहे! युपीएससीचं देखील असंच आहे. तो जो सचिन आहे, तो तुम्ही आहात आणि जो (अख्तर) आहे ती युपीएससी आहे. आता तुम्हाला तिला ओळखायचं आहे. तुम्हाला आता युपीएससी नक्की काय आहे, याच विश्लेषण करायचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम Syllabus चं विश्लेषण करा, त्याची फोड करा, त्याचं पोस्टमॉर्टम करा. उदा. पूर्वपरीक्षेत कोण-कोणते टॉपिक्स आहेत, मेन्ससाठी GS नुसार कोणते आहेत आणि कुठले टॉपिक्स नाहिएत तेदेखील कळणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही त्या बॉलरचं म्हणजे (UPSC) Syllabus चं Analysis एकदा केलं की त्यानंतर त्या बॉलरने मागच्या मॅचमध्ये कसे बॉल टाकले होते ते पहायचं (UPSC Previous Years Question : Papers) म्हणजे Syllabus मध्ये एखादा Topic दिलेला असेल तर त्यामध्ये खूप Sub Point असतील उदा. Society मध्ये एक Topic आहे की Effects of Globalisation on Indian Society, मग Indian Society Globalisation या दोन्ही संकल्पना खूप मोठ्या आहेत आणि जागतिकीकरणाचा समाजातील प्रत्येक घटकावर काही ना काही परिणाम झालेला आहे. मग तुम्ही सगळ्यांची तयारी करणार आहात का? तर अर्थातच नाही. मग अशावेळेस त्या घटकावर मागील वर्षी कसा प्रश्न विचारलाय हे समजणं गरजेचं आहे. यातून पुढे कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, याचा एक अंदाज येतो. थोडक्यात काय तर जो प्रश्नपत्रिका काढतोय, त्याचा Mindset ओळखता आला पाहिजे. त्यामुळे आपल्याला मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करायचं आहे. उदा. 2014 च्या मुख्य परीक्षेत एक प्रश्न आलेला: जागतिकीकरणाचा भारतातील वृद्ध आणि बालके यांवर काय परिणाम झालाय याची चर्चा करा. मार्क्सचा प्रश्न होता; का विचारला असेल हा प्रश्न? त्या वर्षी एक सहें प्रकाशित झाला होता, ज्यामध्ये

भारतीय वृद्धांची काय परिस्थिती आहे. यावर प्रकाश टाकण्यात आला होता. त्यावेळेस तो खूप News: मध्ये होता आणि म्हणून कुठंतरी त्यांनी त्याला Globalisation शी Link केलं आणि तुम्हाला तो प्रश्न विचारलेला होता. आता मला अंदाज आला की बालकं आणि वृद्ध झाले उरलं काय? Youth, Dalits Tnbals, Minorities, Culture, Women Education etc. तर तरुण, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, स्त्रिया, शिक्षण, संस्कृती वगैरे वगैरे. मग मला वाटलं मागच्या वेळेस वृद्ध आणि बालकांवर विचारलं तर यावेळी कदाचित स्त्रियांवर बगैरे विषयावर विचारलं जाऊ शकते. आता Indian Society इतकी मोठी आहे. की तुम्ही प्रत्येक विषयावर अभ्यास करू शकणार नाही. पण जे News मध्ये असतं आणि Relevant असते, त्यातून आपलं Knowledge चेक केलं जाऊ शकतं. Present Scenario मध्ये तर त्याची तयारी केली पाहिजे, म्हणून मी 2015 साठी Globalisation and Women वर तयारी केली आणि डिसेंबर 2015 च्या मुख्यपरीक्षेत आम्हाला प्रश्न हा आला की, Globalisation चा Indian Women वर काय सकारात्मक नकारात्मक परिणाम झालाय ते सांगा.


आता आपण दुसरे उदाहरण बघुया. GS-I मधील History चा Syllabus खूप Vast आहे. यात Indian Culture, Freedom Struggle, Modern World etc. घटक असतात. परंतु या सगळ्यांचा अभ्यास करणार आहोत का आपण? हो सगळ्यांचा केला पाहिजे, पण जे News मध्ये & Relevant असतं त्याचा जास्त केला पाहिजे. उदा. Modern India या घटकामध्ये एक Subtopic आहे की, Contributors & theit Contribution to Freedom Struggle. आता कोणत्याच Contributor चं नाव दिलेलं नाही. मग सर्वच [contributors चा अभ्यास करणं अवघड आणि confusing होतं. 2014 च्या मुख्य परीक्षेत प्रश्न होता की, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे स्वातंत्र्यपूर्व भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारतात काय योगदान आहे ? आता इथे प्रश्न असा पडू शकतो की इतके सगळे Contributors होते, पण UPSC ने मौलाना आझादांवरच का प्रश्न विचारला? तर याचं कारण होतं की, 2014 मध्ये त्यांची 125 वी जयंती होती आणि ते News मध्ये होते. त्यामुळे तसा प्रश्न आलेला सर्वसाधारणपणे हिस्ट्रीचा पेपर काढणान्यांविषयी एक निरीक्षण असे की, 25, 50, 75, 100, 125, 150, 200 वर्षे असा आकडा त्यांच्या विशेष आवडीचा असतो. त्यामुळ मी 2015 ची मुख्य परीक्षा देताना माझा स्वतःचा असा काही एक अंदाज लावला होता. अभ्यास तर सर्वच केला होता पण जे मला जास्त महत्त्वाचं (IMP) बाटलं त्याचा जास्त अभ्यास केला होता. वाचायचं सर्वच, पण जे Relevant आहे ते जास्त वाचायचं. (So Smart Work म्हणजे Short Cut नसतो तर Smart Work म्हणजे 'Hard Work in the Right Direction'). मंग 2015 मध्ये 50,100 वर्षे कशा कशाला पूर्ण होतात ते पाहिलं. उदा. 1915 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालेलं, महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आलेले, आंबेडकरांची 125 वी जयंती होती. ते अर्थातच News मध्ये येत असते, तसंच बर्लिनची भिंत कोसळण्याच्या घटनेला 25 वर्षे पूर्ण झालेली खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण (LPG) Policy) स्वीकारल्यापासून भारताला 25 वर्षे झालेली. त्यामुळे मी या गोष्टींवर खूप Focus केलेला आणि मी ज्यावेळेस मुख्य परीक्षा द्यायला बसलो होतो तेव्हा GS-I ला प्रश्न आलेला जर गांधीजी भारतात आले नसते तर आपल्या स्वातंत्र्याचं स्वरूप कसं असतं?' आंबेडकरांवरही प्रश्न होता की, 'गांधी व आंबेडकर यांचे दलित उत्थानाबद्दलचे ध्येय सारखे होते मात्र मार्ग वेगवेगळे होते. तसेच वर्ल्ड वॉरवर प्रश्न होता की, पहिल्या व दुसऱ्या जागतिक महायुद्धासाठी (WW-I & WW-II) जर्मनी किती जबाबदार आहे ? तात्पर्य, तुम्हाला वाचायचं सगळंच आहे, मात्र जे जास्त Relevant आहे. ते खूप व्यवस्थित वाचणं, त्याची अधिकाधिक Revision करणं गरजेचं आहे. थोडक्यात 'बॉलर' तुम्हाला कशाप्रकारे प्रश्न विचार शकेल हे कळालं तरच तुम्ही चांगल्या प्रकारे प्रश्न सोडवू शकता. एवढंच कशाला आपण SSC & HSC लाही तेच करतो. परीक्षेच्या अगोदर त्या बोड़ने त्याआधीच्या वर्षांमध्ये कसे प्रश्न विचारले आहेत ते वाचून आणि समजून घेऊन मग आपण अंदाज लावू शकतो की काय काय येणार आहे. अर्थात दहावी-बारावीच्या परीक्षेसारखं इथे Question Repeat होत नाहीत. मात्र अंदाज येऊन जातो की आपल्याला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो.


यानंतरचा टप्पा येतो तो Personality Test (Interview) चा. युपीएससीच्या मुलाखतीला एकूण 275 मार्क्स असतात. ज्याला Mains मध्ये Cut off एवढे किंवा Cut off पेक्षा जास्त मार्क्स आहेत, तेच मुलाखतीसाठी पात्र असतात. मुलाखतीचे मार्क्ससुद्धा तुमच्या Final Rank मध्ये Count होत असतात.

मुलाखत ही तुमच्या Knowledge ची Test नाही तर तुमच्या Personality ची Test आहे. पण Personality म्हणजे काय? गोरं असणं, निळे- निळे डोळे असणे, काळे काळे केस असणं, चांगली उंची असणं, चांगली Body असणं म्हणजे Personality नव्हे, UPSC साठी Personality म्हणजे चांगले विचार तुमचे Thoughts, तुमची विचार करण्याची पद्धत, दृष्टिकोन; हे Interview मधून Test केलं जात असतं. Interview ही Final Stage आहे. तुम्ही पूर्व परीक्षा पात्र झालात तरच मुख्य परीक्षा देता येते. मुख्य परीक्षा पास केली तरच Interview देता येतो. मुलाखतीचा टप्पा हा मेन्सच्या निकालानंतर साधारणपणे मार्च ते मे पर्यंत चालतो. (जसे मागच्या वर्षी माझा Interview 7 एप्रिल रोजी होता.) म्हणजे जवळ-जवळ 2 महिने Interview चालत असतात. दिवसात जवळपास 70-72 उमेदवारांचे Interview होत असतात. हे Interview दिल्लीला UPSC च्या घोलपूर हाऊस मध्ये होत असतात. पूर्व परीक्षा जवळपासच्या कोणत्याही विभागात, मुख्य परीक्षा ही राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी (महाराष्ट्रात मुंबई-नागपूर) होते. Interview मधील एक-एक मार्क खूप महत्त्वाचा असतो. कारण एका एका मार्क्सवरून तुमची Rank वर खाली होत असते. मला Interview मध्ये 199 मार्क्स होते. म्हणजे खूप Outstanding Score होता. Mains+ Interview चे मार्क्स मिळून माझी रैंक 361 वी आलेली होती आणि त्यात जर मला एखादा मार्क जास्त असता तर माझी Rank जवळपास 7-8 ने वर सरकली असती. तसेच Cutoff पेक्षा मार्क्स जास्त किंवा कमी होऊन पास आणि नापास होणारी मुलदेखील आहेत. तात्पर्य इथे एका-एका गुणाला खूप महत्व आहे.


मुलाखतीमध्ये एक Panel असतं. Interview घेण्यासाठी त्या Panel मध्ये साधारणपणे 5 सदस्य असतात. त्यातील 1-2 निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी असतात. काहीजण Education Sector, काहीजण साहित्य क्षेत्रातील असतात, काहीजण Academician असतात. काहीजण Thinkers इ. असतात. पॅनलचे अध्यक्ष हे युपीएससीचे सदस्य असतात. तसेच इतर चार जणांमध्ये साधारणपणे एखादया महिला सदस्य असतात. मुलाखत सर्वसाधारणपणे 30 ते 35 मिनिटे चालते.


2nd CHAPTER : युपीएससी काय ?  2nd CHAPTER : युपीएससी काय ? Reviewed by Aslam Ansari on June 10, 2021 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.