UPSC मी आणि तुम्ही | 1st Chapter


युपीएससी का ? 


ऐकावे जनाचे करावे...



'Why UPSC?". युपीएससी करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला सर्वप्रथम आपल्याला यूपीएससी का करायची आहे, याची स्पष्ट जाण असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर "What is UPSC?" यूपीएससीची परीक्षा नेमकी काय आहे हे समजून घेतले पाहिजे. पूर्व परीक्षा, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये युपीएससीची परीक्षा होते.

 

प्रथम आपण मुख्य परीक्षेमध्ये जनरल स्टडीज म्हणजे GS-I+Essay (निबंध) यांची तयारी कशी करायची, त्याचा अभ्यासक्रम व त्यातील घटक काय असतात, त्यासाठी आपला दृष्टिकोन (Approach) कला असला पाहिजे, कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचायची ते सगळं पाहणार आहोत. त्यानंतर GS-II + Optionals + Comp. Languages (वैकल्पिक विषय आणि भाषा) तसेच GS -III+GS IV या घटकांची तयारी व अभ्यास पद्धतीबद्दल बघणार आहोत.

 

मुख्य परीक्षा झाल्यावर जो Interview चा म्हणजे मुलाखतीचा टप्पा असतो, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यानंतर आपण Prelims म्हणजे पूर्व परीक्षेकडे वळणार आहोत. मात्र सर्वप्रथम मी वर म्हटल्याप्रमाणे हे स्पष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे की, तुम्ही युपीएससी का देताय ? युपीएसस ही देशातील सर्वात महत्वाची व कठीण समजली जाणारी परीक्षा आहे. शिवाय या परीक्षेत वयाच्या एकविसाव्या वर्षी, तेही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणं हे क्वचित आणि अपवादाने घडतं. या परीक्षेतील निवड किंवा यशाचे प्रमाण (Selection Ratio) हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रयत्नांचे आहे. तसेच निवड झालेल्यांच्या वयाची सरासरी ही 26 27 वर्ष अशी असते. शिवाय पहिल्या प्रयत्नात अपयश आलं तरी आपण खूप खचून जातो. Frustration येत, Tension येतं; केवळ Attempt दिल्यानंतरच नव्हे तर तुम्ही आतापर्यंत Undergraduate आहात, तुमच्याकडे 2 वर्षे आहेत, तुम्ही चार महिने अभ्यास केला तरी कधीकधी पाचव्या महिन्यापासून तुम्हाला Boring वाटायला लागतं, तुम्हाला त्रास व्हायला लागतो. त्यामुळे अश्यावेळेस एक Self Motivation असणं, आपण जे करतोय त्या गोष्टीवर आपलं प्रेम असणं, आपल्याला ती गोष्ट आवडणं खूप गरजेचं असतं. त्याचसाठी ह्या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट असणं गरजेचं आहे, की तुम्हाला ही Exam का द्यायची आहे? त्यातली पहिली गोष्ट ही की हे सर्व पैशासाठी, Power & Status साठी करायचं का? तुम्ही ज्यावेळेस एक Officer होता, त्यावेळी खूप चांगली Salary आपल्याला मिळत. असते. सातव्या वेतन आयोगानंतर तर ती आणखीनच वाढली आहे. ट्रेनिगनंतर जेव्हा पोस्टिंग होतं,त्यावेळी शासनाकडून तुम्हाला राहायला बंगला मोफत भेटतो, बंगल्यातला बगीचा, बगीचासाठी माळी, किचनमधला कूकदेखील शासनाचा असतो. शासन तुम्हाला गाडी देते, गाडीवरचा दिवा, गाडीचे इंधन, गाडीचा ड्रायव्हर इत्यादी सर्व सुविधा शासन पुरविते. (थोडक्यात काय तर पती-पत्नी सोडून बाकी सर्व काही शासन तुम्हाला पुरवित असते.) त्यामुळे आयएएस अधिकारी झाल्यानंतर एक Upper Middle Class Life जगता येईल, एवढा चांगला पगार आणि अन्य सर्व सुखसुविधा आपल्याला शासन उपलब्ध करून देते. शिवाय आपण ज्या पदावर विराजमान आहोत त्या अनुषंगाने येणारे अधिकार आणि सत्तादेखील आपण उपभोगत असतोच.

 

यूपीएससी हा एक सर्वोत्तम करियरचा पर्याय आहे यात कुठलीही शंका नाहीच, मात्र या सर्व सुखसुविधांसाठी फक्त आपल्याला या System मध्ये यायचं नाहीए. फक्त आपला विकास, आपल्या घरच्यांचा विकास, आपल्या आई-वडिलांचा विकास एवढंच गरजेचं नाही. कारण आपण देशाचा एक भाग आहोत, एक सामाजिक प्राणी आहोत आणि आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचा विकास होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी UPSC हे एक चांगलं माध्यम आहे. त्यामुळे पैसा कमावणं, Power मिळवण किंवा ते Status कमविणं किंवा त्या माध्यमातून पदाचा बडेजाव मिरविणे किंवा Show Off करणं यासाठी आपल्याला युपीएससी नाही करायची. किंवा लाल दिव्यासाठी, त्या बंगल्यासाठी गाडीसाठीही नाही करायची. हे सर्व आपल्याला पदाबरोबर आपोआप मिळणारच असतं. त्यामुळे आपल्याकडे युपीएससी करण्यासाठी काही वेगळी कारणं ही असलीच पाहिजेत.


 

तुम्ही का आलं पाहिजे या क्षेत्रामध्ये ?

 

(1) हे Public Service चं खूप चांगलं माध्यम आहे.

 

(2) देशाची सेवा करण्याची संधी मिळते.

 

कारण तुम्ही जिल्हाधिकारी होता, काही वर्षांनी तुमचं Promotion होतं, तुम्ही Secretary होता मग Secretary Level वरून तुमचं Promotion होत होत जातं. जर तुम्ही 21-22 व्या वर्षी IAS झाला असाल तर शेवटी तुम्ही देशाचा Cabinet Secretary होऊ शकता. आणि हे Cabinet Secretary मंत्र्यांना सल्ला देण्याचं काम करतात. देशाच्या Policies बनवण्याचं काम ते करत असतात. कायदेनिर्मितीमध्ये त्यांचा मोठा वाटा असतो. हे तुम्हाला या माध्यमातून करता येऊ शकतं.

 

(3) Service of Downtrodden (वंचित घटकांच्या सेवेची संधी)

 

समाजातील स्त्रिया, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक अशा सर्व वंचित घटकांच्या प्रगतीसाठी, उत्थानासाठी देखील खूप काम करता येतं. या सर्व घटकांसाठी असलेल्या शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी आपण करू शकतो. सध्या आपण पाहतो की देशात गोरगरीब व वंचितांसाठी विविध योजना आहेत, मात्र त्या अधिकाऱ्यांच्या पुरेशा कार्यक्षमतेअभावी लालफितशाहीमध्ये किंवा दफ्तरदिरंगाईमध्ये अडकून पडतात. त्यामुळे समाजातील खालच्या स्तरातील लोक हे अशा लोककल्याणकारी योजनांपासून वंचित राहतात. आपल्याला त्यांचा विकास करायचा असेल तर, UPSC मधून IAS Officer होणं हा एक उत्तम मार्ग ठरतो.

 

(4) Self Motivation स्वयंप्रेरणा

 

तुम्हाला माझ्या एखाद्या Lecture अथवा भाषणामधून प्रेरणा मिळाली आणि तो झालाय तर मी का होऊ शकत नाही?' तर हे केवळ असं असू नये. 'शिक्षक, आई-वडील म्हणाले' म्हणून केलं. 'माझ्या Girlfriend ने Class लावला, म्हणून मी Class ला गेलो' किंवा Vise Versa किंवा अजून काहीतरी. तुमचं जे Motivation आहे ते Self Motivation असणं गरजेचं आहे. थोडक्यात, आपण जे करत आहोत ते आपण का करत आहोत हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. तुम्हाला विचारांच्या या स्पष्टतेचा मुलाखतीतही लाभ होईल. कारण, बऱ्याचदा मुलाखतीत तुम्हाला IAS का व्हायचं आहे' असा प्रश्न विचारला जातो.

UPSC मी आणि तुम्ही | 1st Chapter UPSC मी आणि तुम्ही | 1st Chapter Reviewed by Aslam Ansari on June 05, 2021 Rating: 5

1 comment:

Powered by Blogger.