5] पूर्व परीक्षा व्यूहनीती
साधली तर शिकार, नाही तर भिकार
UPSC-Prelims
UPSC CSE मधील हा सर्वात पहिला टप्पा आहे. संख्येच्या मानाने येथे मोठी स्पर्धा असते. हा टप्पा पार केल्याशिवाय पुढील मुख्य परीक्षेच्या टप्प्यापर्यंत पोहोचता येत नाही. यामध्ये दोन पेपर्स आहेत एक GS-1व दोन CSAT यापैकी दुसरा पेपर (CSAT) हा Qualifying आहे. म्हणजे या पेपरमध्ये तुम्हाला 200 पैकी केवळ 66 गुण (33%) मिळवायचे आहेत. मात्र हे गुण तुम्हाला Pre च्या मेरिटसाठी मदतीचे ठरत नाही. मुख्य परीक्षेसाठीची निवड ही फक्त GS-1 मधील तुमच्या गुणांवरून ठरते. अर्थात, CSAT मध्ये तुम्हाला 66 पेक्षा कमी गुण मिळाले तर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरता.
पूर्व परीक्षेच्या तयारीविषयी बोलण्यापूर्वी आपण प्रथमतः त्याचा Syllabus बघूया.
Paper I-(200 marks) Duration: Two hours
(1) History of India and Indian National Movement.
(2) Indian and World Geography - Physical, Social, Economic Geography of India and the World.
(3) Indian Polity and Governance Constitution, Political System, Panchayati Raj, Public Policy, Rights Issues, etc.
(4) Economic and Social Development -Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector Initiatives, etc.
(5) General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate
Change that do not require subject specialisation
(6) General Science.
यानंतर आपण 2013 ते 2016 या वर्षांत पूर्व परीक्षेत कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले आहेत ते बघूया.
विषय भोगोल कृषी राज्यशास्त्र इतिहास अंतरराष्ट्रीय संबंध व संरक्षण संस्कृती शास्त्र आणि तंत्रज्ञान अर्थव्यवस्था
पूर्व परीक्षा- विषयनिहाय प्रश्न
2015 मध्ये जवळ-जवळ 53 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातून केवळ 15000 मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले. 15000 जणांनी मुख्य परीक्षा दिली होती, त्यातील केवळ 2,800 जण मुलाखतीसाठी पात्र ठरले. मुलाखत दिलेल्या 2800 पैकी शेवटी 1080 जणांना पोस्ट मिळाल्या. म्हणजे जवळ-जवळ साडेपाच लाखातून 1080 जण अंतिमत: सिलेक्ट झाले. यूपीएससीचे पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे तीन टप्पे आहेत, त्या तिन्हीमध्ये काही सिलॅबस हा कॉमन आहे तर काही ओव्हरलॅपींग आहे. पण प्रत्येक टप्प्याची मागणी ही वेगवेगळी आहे. ती पूर्ण केली तरच तुम्ही पास होत असता. जसे मुख्य परीक्षेत यशस्वी होण्यासाठी Knowledge, Reading, Revision व Writing गरजेचे असते, त्याचप्रमाणे पूर्व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पुढील घटक गरजेचे असतात. Wide Reading, Information, Practice यात नक्की कसा फरक पडतो? आम्ही चौघं क्लासमेट्स होतो. आमचं ध्येयदेखील एकच होतं. आम्ही असं ठरवलं की, आपल्याला 9 महिने आधीपासून प्रिचा अभ्यास करायचा आहे. तर आपण असं करुयात की युपीएससी प्रिसाठी जसे प्रश्न फ्रेम करते, तसेच प्रश्न आपण स्वतः फ्रेम करून सोडवायचे व त्यावर चर्चा करायची. मग पुढच्या रविवारी भेटल्यानंतर प्रत्येकाला जो विषय दिलाय, त्यावर त्याने प्रश्न तयार करायचे असं टार्गेट असायचं. त्याचबरोबर करंट अफेयर्सवरही प्रश्न काढायचे आणि ते सर्वांना सोडवण्यासाठी द्यायचे. मग तो पेपर वेळ लावून सोडवायचा आणि एकमेकांनी मग तो चेक करायचा. कुठं-कुठं काय चुकलं, आपल्या अभ्यासात, नियोजनात काही चुकतंय का, यावरती आम्हा Discussion करायचो. असं करत करत आम्ही सगळ्या विषयांच्या NCERT ची पुस्तके मुख्य Referenc Books, UPSC च्या सगळ्या विषयांच्या Comprehension Test घेतल्या. असं करत करत आम्ही जवळ जवळ 7500 प्रश्न सोडवले म्हणजे जवळ-जवळ 75 पेपर्स सोडवले होते. यातून तुम्हाला समजेल की किती प्रॅक्टिस लागते ती.
UPSC मध्ये तुम्हाला काही गोष्टींची तुम्हाला माहिती असणं अपेक्षित असत. पण ती थोडीशी असूर चालत नाही, थोडी डिटेलमध्ये आवश्यक असतं. मला आठवतं ज्यावेळेस मी करंट अफेयर्स वाचत । त्यावेळेस नामधाप्या नॅशनल पार्क न्यूजमध्ये होतं. कारण सेन्सस (Census) नुसार या पार्कमध्ये गेंड्यांची संख्या काझीरंगात दुसन्या नंबरवर होती. म्हटलं, आपल्याकडे नॅशनल पार्क 100 पेक्षा जास्त आहेत. [100 या 100 सर्व कुठे करायचे. त्यापेक्षा जे न्यूजमध्ये आहे ते व्यवस्थित म्हणून मरा मी नामधाप्पाची माहिती काढली. इंटरनेटवरून से कुठल्या राज्यात आहे पाहिलं, गेडयांच्या संख्येबद्दल वाचले इत्यादी. पण म्हटलं हे तर सर्वच वाचणार असतील, आपण थोडं खोलात जाऊन माहिती काढूयात. इतर आवश्यक तेवढी सगळी माहिती मी वाचली. 23 ऑगस्टला युपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न होता, तो प्रश्न आणि माझी नोट पुढे दिली आहे. यावरून तुम्हाला माहितीचं महत्व कळेल. 2015 च्या पूर्वपरीक्षेतील एका प्रश्नावर 'द हिंदू' या वृत्तपत्राच्या साहाय्याने मी तयार केलेली नोट वर दिली आहे.
Q. Which one of the following National Parks has a climate that varies from tropical to subtropical, temperate and arctic?
(a) Khangchendzonga National Park
(b) Nandadevi National Park
(c) Neora Valley National Park
(d) Namdapha National Park.
अचुकतेसाठी (Accuracy) रिव्हिजन आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नोट्स काढाव्या लागतात, तसंच त्या वारंवार वाचाव्या लागतात. कारण प्रिलिम ही पूर्ण Factual आहे. तुम्हाला एक-एक गोष्ट बारकाईने वाचावी लागते, पुन्हा पुन्हा वाचावी लागते. मी स्वतःच्या नोट्स बनवल्या होत्या, त्या (micro notes) होत्या. पूर्ण नोट्सची रिव्हिजन व्हायला मला 12 तास लागायचे. शेवटचा महिना मी रोज फक्त त्याच त्याच नोट्सची उजळणी करायचो. एवढी प्रॅक्टिस झाली होती की, माझ्या नोट्समध्ये पुढे काय लिहिलंय ते देखील आठवायचं. आता या रिव्हिजनचा कसा फायदा झाला ते बघू. नोट्समध्ये IUCN नावाची संस्था होती, त्याबद्दल लिहिलेलं होतं. तो प्रश्न व माझी त्यावरील Note खालीलप्रमाणे-
Q. With reference to the International Union for Conservation of Nature and Natural Resources (IUCN) and the Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora (CITES), which of the following statements is/are correct?
(1) IUCN is an organ of the United Nations and CITES is an international
agreement between governments (2) IUCN runs thousands of field projects around the world to better manage natural environments.
(3) CITES is legally binding on the States that have joined it, but this Convention does not take the place of national laws.
Select the correct using the code given below.
(a) 1 only
(c) 1 and 3 only
(b) 2 and 3 only
(d) 1, 2 and 3
खूप-खूप वेळा रिव्हिजन केल्यामुळे जेवढं लिहीलय ते लक्षात राहिलेल, पूर्वपरीक्षेत प्रश्न होता की, IUCN बद्दल दिलेल्या खालील 4 विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे? त्यामध्ये 2, 3 आणि चौथ्या स्टेटमेंट बद्दल एवढं वाचूनही काहीच माहिती नव्हतं. पण पहिलं स्टेटमेंट होतं की, IUCN ही UN ची अँच आहे. मला नोट्समधला मुद्दा लगेच आठवला. त्यात मी लिहिलेलं होतं की IUCN ही एक NGO आहे. मग मी म्हटलं ही जर NGO असेल, तर एका UN सारख्या Governance Body ची ती Branch असू शकत नाही.
यानंतर 1 हा पर्याय बगळून मी उत्तर काढले. थोडक्यात रिव्हिजनचे महत्त्व तुम्हाला आता लक्षात आले असेल.
आणखी एक प्रश्न होता की
Q.there is Parliamentry system of Government in India because the
(a) Lok Sabha is elected directly by the people.
(b) Parliament can amend the constitution.
(c) Rajya Sabha cannot be dissolved.
(d) Council of Ministers is responsible to the Lok Sabha.
आता हा प्रश्न मी आमच्या मित्रांसोबत चर्चेवेळी घेतलेला. पण तरीदेखील माझ्या मित्रानं तो प्रश्न पूर्वपरीक्षेत चुकवला. कदाचित त्याची ती रिव्हिजन झाली नसल्याने तो प्रश्न चुकला. माझा तो मित्र खूप हुशार, अभ्यासू होता. आम्ही एकत्रच अभ्यास करायचो. त्याची प्रिलिम फक्त 2 मार्कोनी राहून गेली, तो मेन्स आणि इंटरव्ह्यूदेखील सहज क्लीयर झाला असता..
आता प्रत्यक्ष पेपर लिहिताना काय करावं तर समजा तुम्हाला पहिला प्रश्न 100% येत असेल तर प्रश्नपत्रिकेवर त्या प्रश्नावर खुण करून पुढे जा. दुसऱ्या प्रश्नात तुम्ही अडकला, त्यात तुम्हाला माहितेय यामध्ये D & C Option:नाहिये. पण A, B पैकी कोणतातरी एक आहे. तिथं काय करा तर (2) लिहून ठेवा, मात्र तो प्रश्न सोडवू नका. तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला कळलं की A,B,C पैकी एक आहे. D 100% नाही तिथं (3)लिहा. चौथा प्रश्न तुम्ही पाहिला आणि तुम्हाला समजलं, यातल काहीच येत नाही तिथं (4) लिहा. असं करत करत पूर्ण पेपर संपवा. पेपरचा पहिला राऊंड पूर्ण झाल्यावर चेक करा की तुमचे किती प्रश्न 100% बरोबर आहेत. ते जर 30-40 प्रश्न असतील तर तेवढ्या मार्क्सवर तुम्ही पास होणार आहात का? तर नाही. मग (2) अशी खूण केलेल्या प्रश्नांसाठी दुसरा राऊंड घ्यायचा. डोकं थोडंसं शांत ठेवून थोडा Logically विचार करुन त्यांची उत्तर लिहायची. मग समजा हे पकडून तुम्ही 60 प्रश्न सोडवले आणि तुम्हाला वाटलं की एवढ्या प्रश्नाने आपण लिस्टमध्ये येऊ शकत नाही. कारण 60 च्या 60 प्रश्न बरोबर येणार नाहीत. मग तुम्ही थोडीशी जास्त रिस्क घेऊन (3) अशी खूण केलेले प्रश्न तिसन्या राऊंडमध्ये सोडवायला घेऊ शकता. साधारणपणे तुम्ही 100 पैकी 80-85 प्रश्न सोडवणं गरजेचं असतं. अशाप्रकारे तोलूनमापून तुम्ही GS चा पेपर Attempt करु शकता.
सामान्य अध्ययन Pre Tips (GS)
(1) साधारणपणे मुख्य परीक्षेची तयारी झाल्यानंतर तुम्ही पूर्व परीक्षेची तयारी सुरू करावी. म्हणजे ज्यावर्षी तुम्ही परीक्षा देणार आहात, त्यावर्षी पूर्व परीक्षेची तयारी सुरू करा.
(2) साधारणपणे Pre च्या तयारीला 8 ते 9 महिन्यांचा वेळ द्यावा. अर्थात, काहींच्या मते 6 महिने एवढा कालावधीही पुरेसा ठरतो. मात्र तुम्ही पहिलाच प्रयत्न देत असाल आणि तुम्हाला पुरेसा आत्मविश्वास नसेल तर 8-9 महिने पूर्व परीक्षेची तयारी करा. येथे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जर तुम्ही जास्तीत जास्त फोकस मेन्सवर केला आणि Pre साठी केवळ 4-5 महिने वेळ दिला तर तुम्ही Pre पास होणार की नाही हे सांगता येत नाही आणि दुर्दैवाने तुम्ही Pre मध्ये फेल झालात तर मेन्सचा अभ्यास त्यावर्षी काहीही उपयोगात येत नाही. त्यामुळे पूर्वपरीक्षा गांभीर्याने घ्या.
(3) आता हा प्रश्न पडेल की, या 8 9 महिन्यात करायचं काय? तर GS 1 चा विचार करता तुम्हाला खालील विषय व पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो.
(a) Culture - Nlos, R. S. Sharma's, NCERT, Unique Academy's Videos
(b) Modern India - NCERT, Bipin Chandra - NCERT, Spectrum (c) Geography - NCERT, G.C. Leong, Maps
(d) Economics - Budget, Economic survey, India year book, NCERT, mrunal. org, गोविळकर आर्थिक संकल्पना.
(e) Polity-M. Laxmikanth, NCERT
(f) Environment - Shankar IAS's book, ICSF text book of 9 and 10 standard, mrunal.org.
(g) Science Tech - NCERT
(h) Current Affairs - The Hindu or Indian Express. Bulletin Of Unique Academy & Vision IAS Magazine.
या संदर्भाचा तुम्हाला मेन्सलाही फायदा होतोच. तुम्ही संदर्भाची यादी, पूर्व परीक्षेतील स्पर्धा आणि अॅक्युरसीचे महत्व लक्षात घेतले तर तुम्हाला लक्षात येईल की, 8-9 महिने अभ्यास करणे का महत्त्वाचे आहे.
(4) वरील संदर्भ हे बहुतांश इंग्रजीमध्येच उपलब्ध आहेत आणि माझ्या मते, पूर्व परीक्षेत प्रश्न इंग्रजीत
विचारणार असल्याने तुम्हीही संदर्भ इंग्रजी वाचणे गरजेचे आहे. याचे दोन मुख्य फायदे होतील
(1) परीक्षेतील प्रश्न वाचताना शब्दाचा अर्थ लावण्यास अडचण येणार नाही.
(2) इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त दर्जेदार संदर्भ साहित्य उपलब्ध असल्याने, राष्ट्रीय स्तराची स्पर्धा अनुभवताना तुम्हाला कमीपणा वाटणार नाही. कारण तुम्हीही तेच वाचले असणार जे इतर वाचतील.
(5) या 8-9 महिन्यात खालील गोष्टीच करा:
(i) वाचा
(ii) पुन्हा वाचा
(iii) Revision करा.
(iv) Re-Revison करा.
(v) Notes काढा.
(vi) Notes ची Revison करा.
(vii) जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा.
(viii) दररोज न चुकता न्यूजपेपर वाचा व त्याच्या नोट्स काढा.
(6) पूर्व परीक्षेसाठी नोट्स कशा काढाव्यात, हे समजण्यासाठी प्रश्न कसे विचारतात हे समजणे आवश्यक.आहे. म्हणून सर्वप्रथम Pre च्या मागील 8-10 वर्षातील प्रश्नपत्रिका नक्की बघा.
(7) आता Pre साठी नोट्स कशा बनवाव्यात, याचे एक प्रातिनिधिक उदाहरण आपण बघुया. समजा तुम्ही 9 वी चे भूगोलाचे NCERT वाचत आहात. त्यातील Drainage या तिसऱ्या प्रकरणातील पान क्रमांक 20 वर Ganga River System हा भाग तुम्ही वाचत आहात
The Ganga River System: The headwaters of the Ganga, called the 'Bhagirathi is fed by the Gangotri Glacier and joined by the Alaknanda at Devaprayag in Uttarakhand. At Haridwar, the Ganga emerges from the mountains on to the plains. The main tributaries, which come from the peninsular uplands, are the Chambal, the Betwa and the Son. These rise from semi arid areas, have shorter 'courses and do not carry much water in them. Find out where and how they ultimately join the Ganga. Enlarged with the waters from its right and left bank tributaries. the Ganga flows eastwards till Farakka in West Bengal. This is the northernmost point of the Ganga delta. The river bifurcates here; the Bhagirathi-Hooghly (a distributary) flows southwards through the deltaic plains to the Bay of Bengal. The mainstream, flows southwards into Bangladesh and is joined by the Brahmaputra. Further down stream, it is known as the Meghna. This mighty river, with waters from the Ganga, and the Brahmaputra, flows into the Bay of Bengal. The delta formed by these rivers is known as the Sunderban delta.
• The Sundarban Delta derived its name from the Sundari tree which grows well in marshland..
• It is the world's largest and fastest growing delta. It is also the home of Royal Bengal tiger.
The length of the Ganga is over 2500 km. Look at figure 3.4; Can you identify the type of drainage pattern formed by the Ganga river system? Ambala is located on the water divide between the Indus and the Ganga river systems. The plains from Ambala to the Sunderban stretch over nearly 1800 km, but the fall in its slope is hardly 300 metres. In other words, there is a fall of just one metre for every 6 km. Therefore, the river develops large meanders.
या भागावर खालीलप्रमाणे नोटस् निघतील.
(8) पूर्व परीक्षेसाठी जाण्यापूर्वी तुम्ही किमान 50 सराव प्रश्नपत्रिका सोडवाव्या. या प्रश्नपत्रिका Insights on India, Vision IAS अशा websites वर उपलब्ध होतात. याशिवाय पुण्यातील काही झेरॉक्स केंद्रांवरदेखील या प्रश्नपत्रिका उपलब्ध होतात. जास्तीत जास्त सराव केल्याने परीक्षेत ज्या चुका होऊ शकतात, त्या टाळता येतात. यूपीएससी Pre मधील सराव प्रश्नाचे पर्याय सारखेच वाटतात, त्यामुळे सरावाशिवाय व रिव्हिजनशिवाय पर्याय नाही.
(9) सध्याच्या पूर्वपरीक्षेचा ट्रेंड बघता, जास्तीत जास्त भर हा चालू घडामोडींना दिला जात असल्याचे दिसते. त्यामुळे दररोज न चुकता न्यूजपेपर वाचा
(10) सराव करताना 2 तास वेळ लावून पेपर सोडवा.
(11) परीक्षेच्या दिवशी शांत राहा. अस्वस्थ होऊ नका.माझ्या अनुभवानुसार पूर्व परीक्षा देणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचा पूर्ण अभ्यास झालेला नसतो आणि तुमचाही झालेला नसणार. त्यामुळे आहे ती परिस्थिती स्वीकारा व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. अभ्यास चांगला झाला असतानाही परीक्षा हॉलमधील प्रेशर सहन न झाल्यानं येत असणाऱ्या प्रश्नाची उत्तरही चुकली असल्याची उदाहरणं मी पाहिली आहेत. याउलट अभ्यास कमी असतानाही आत्मविश्वास कायम असल्यामुळे प्रश्नांची उत्तरे बरोबर देता आली. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी शांत राहा, टेन्शन घेऊ नका.
(12) परीक्षेच्या दिवशी काहीही वाचू नका. त्याचा तुमच्या मनावर नकारात्मकच परिणाम होतो.
(13) परीक्षा देताना संपूर्ण पेपर एकदा वाचण्याच्या फंदात पडू नका. सरळ-सरळ पहिल्या उत्तरे लिहिण्यास सुरवात करा.
(14) प्रश्न सोडवताना मघाशी सांगितल्याप्रमाणे (2), (3), (4) ही पद्धत वापरा.
(15) 100 पैकी 100 प्रश्न सोडवण्याचा अट्टाहास करु नका पूर्व परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरास 0.33% एवढी निगेटिव्ह मार्किंग असतं हे लक्षात घ्या. अर्थात किती प्रश्न सोडवायचे हे प्रश्नपत्रिकेवर अवलंबून असतं. उदा. प्रश्नपत्रिका खूपच सोपी असेल तर 86 ते 95 प्रश्न सोडवावेत. प्रश्नपत्रिका मध्यम असेल तर 76 ते 85 प्रश्न सोडवावेत आणि प्रश्नपत्रिका खूपच अवघड असेल तर 70-75 प्रश्न सोडवावेत.
(16) युपीएससीमध्ये कॉप्या वा चिटींग करण्याला कोणताही वाव नाही. त्यामुळे तसा प्रयत्नही करु नका.
(17) प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर सोडून द्या. तुमच्या आजूबाजूच्या मुलांना उत्तर विचारु नका. कारण एकतर ते उत्तर सांगणार नाहीत किंवा सांगितलं तरी ते बरोबर असतचं असं नाही.
(18) प्री झाल्यानंतर फारसा गाजावाजा न करता मेन्सच्या तयारीला लागा.
(19) GS मध्ये निर्णायक ठरणाऱ्या घटकांची माहिती पुढील आकृतीच्या साहाय्याने दर्शविता येते.
CSAT
-घरले तर चावते सोडले तर पळते
CSAT सर्वप्रथम CSAT चा Syllabus पाहूया
CSAT Paper-2 (APTITUDE TEST)
(1) Comprehension
(2) Interpersonal skills including Communication skills;
(3) Logical reasoning and Analytical ability. (4) Decision-making and problem solving
(5) General Mental Ability
(6) Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data Interpretation (charts, graphs, tables, data sufficiency etc. - Class X level)
(7) English Language Comprehension skills (Class X level)
यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पूर्वपरीक्षेतील CSAT चा हा पेपर Qualifying असतो. म्हणजेच या पेपरमध्ये एकूण 80 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण असतात. एकूण 200 माकांपैकी तुम्हाला किमान 66 गुण मिळवणं आवश्यक असतं. अन्यथा तुम्ही GS मध्ये चांगले गुण मिळवूनही मुख्य परीक्षेस अपात्र ठरू शकता. हे 66 गुण मिळवणं फारसं अवघड नसलं तरी त्यास lightly घेणं धोक्याचं ठरु शकतं. त्यामुळे या विषयाचीही योग्य तयारी करणं आवश्यक आहे.
माझ्यामते, तुम्ही ज्यावर्षी पूर्व परीक्षा देणार आहात तिच्या 3 महिन्याआधीपासून CSAT ची तयारी सुरु करावी. यात दररोज किमान 2-3 तास CSAT चाच अभ्यास करावा. समजा तुम्ही जूनमध्ये Pre देणार असाल, तर 1 मार्च पासून CSAT ची तयारी सुरु करा.
• माझ्या निरीक्षणानुसार CSAT मध्ये सर्वाधिक महत्व हे English Comprehension ला आहे. त्यामुळे English Comprehension ची तयारी करण्याशिवाय पर्याय नाही.
• वर UPSC CSAT चा Syllabus दिला आहे. त्याला पुढील 3 घटकांत थोडक्यात विभागता येते.
(1) English Comprehension
(2) Maths
(3) General Mental Ability.
आपण या टॉपिकसंदर्भात सविस्तर बोलूया.
उताऱ्यावरील प्रश्न (Comprehension)
उताऱ्यावरील प्रश्न हा पेपर 2चा मूळ गाभा असणारा घटक आहे. दरवर्षी या एका घटकावर साधारण 30 तरी प्रश्न विचारले जातात. म्हणजेच एकूण 75 गुण केवळ या एका घटकावरच अवलंबून आहेत. म्हणून उताऱ्याचं वाचन व त्यावरील प्रश्न सोडवण्याचं कौशल्य सुधारणं निश्चित गरजेचं आहे. जवळजवळ अर्धा भाग असलेल्या या घटकासाठी बाचन - आकलन सुधारणं सर्वाधिक गरजेचं आहे. दिलेल्या उताऱ्यावरून उमेदवाराला काय माहिती समजली आहे, तसेच त्या माहितीवर आधारित कोणत्या प्रकारचे निष्कर्ष आणि अनुमान उमेदवार काढू शकतो, याची ही चाचणी आहे. यासाठी सर्वात आधी उतारा काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. जर पहिल्या वाचनात उतान्याचा अर्थ लक्षात येत नसेल तर कमी वेळात दुसरे वाचन करण आवश्यक आहे. लेखकाला नक्की काय म्हणायचं आहे आणि नेमका कोणता अर्थ उताऱ्यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, याची स्पष्टता वाचल्यानंतर येणं गरजेचं आहे.
आंतरवैयक्तिक कौशल्य (Interpesonal Skill)
बाला अनेकदा इंग्रजीमध्ये Soft Skill असंही म्हटलं जातं. कामाच्या ठिकाणी अथवा इतरत्र विविध व्यक्तींशी संवाद साधत असताना उमेदवार कोणत्या प्रकारच्या वर्तणुकीला प्राधान्य देईल, हे यामध्ये तपासलं जातं. तसेच जास्त प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण परिस्थिती निर्माण करण्याची संवादकौशल्यं उमेदवाराकडे आहेत की नाही, हे तपासलं जातं. विविध व्यक्तींशी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये संवाद साधता येणं यामध्ये महत्त्वाचं समजलं जातं. आंतरवैयक्तिक कौशल्याचे प्रमुख घटक पुढीलप्रमाणे
(1) संप्रेषण कौशल्य
(2) दुसऱ्याचे मत संयमानं ऐकण्याची तयारी
(3) ठामपणा
(4) तणावाचं नियोजन (5) निर्णयक्षमता
(6) समस्या सोडवणूक
(7) मौखिक संवाद
(8) अमौखिक संवाद
या घटकावर यूपीएससीने आजपर्यंत फारसे थेट प्रश्न विचारलेले नाहीत. किंबहुना 2011, 2012, 2013 आणि 2014 या कोणत्याही वर्षी या घटकावर प्रश्न नाहीत. याचा अर्थ हा घटक नाही केला तर चालणार आहे का? युपीएससी यावर प्रश्न विचारणारच नाही, असे खात्रीनं म्हणता येत नाही. म्हणूनच हा घटक कमी प्राधान्याचा असू शकतो. तार्किक अनुमान आणि विश्लेषणात्मक कौशल्ये (Logical Reasoning & Analytical Ability)
या घटकाचे प्रश्न हे ठरावीक प्रकारचे आणि ठरावीकच उपघटकांवर विचारले जातात. यामध्ये दिशा, नातेसंबंध, संख्यामाला पूर्ण करणे अशाप्रकारचे अनेक प्रश्न असतात. या घटकामध्ये अचुकता येण्यासाठी भरपूर सरावाची गरज असते. सर्व वस्तुनिष्ठ परीक्षांमध्ये तार्किक अनुमानाचा घटक असतोच आणि सीसॅटही त्याला अपवाद नाही. या घटकावरचे प्रश्न मध्यम काठिण्य पातळीचे असतात आणि चांगला. सराव केलेला असल्यास सहजपणे हाताळता येतात. निर्णयक्षमता आणि समस्या सोडवणूक (Decision Making & Problem Solving) प्रशासकीय अधिकारी म्हणून उमेदवारांनी कमी वेळात, वस्तुनिष्ठ, तार्किक आणि कल्याणकारी निर्णय घेणं अपेक्षित असतं. एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून कृती होणं अपेक्षित असतं. तसेच राजकीय अथवा इतर कोणत्याही दबावाला बळी न पडणं अशी कसरतही असते. याप्रकारचे प्रश्न तुमच्यातील निर्णयक्षमता तपासून पाहतात. याचबरोबर तुमचा प्रामाणिकपणा, निष्ठा आणि प्रशासकीय मूल्यांचे भान या गोष्टीदेखील तपासल्या जातात. एकंदरीतच उमेदवाराकडे सर्वसाधारण तार्किक बुद्धी आणि आधुनिक काळातील आव्हानांचा सामना करत समस्या सोडवण्याची क्षमता आहे की नाही, हेदेखील पाहिलं जातं. प्रश्नाचे उत्तर देत असताना तुमच्याकडून एक तर कोणत्या तरी कृतीची अपेक्षा असते किंवा कोणती कृती का बरोबर ठरेल याचं स्पष्टीकरण देण्याची गरज असते. खालील पाच टप्प्यांचा
वापर करून हे प्रश्न सोडवता येतात
(1) समस्या ओळखणं.
(2) विविध उपायांचा विचार करणं.
(3) योग्य उपाय निवडणं.
(4) इतर पर्याय बाद करणं.
(5) निर्णय पक्का करणं.
सामान्य बुद्धिमापन चाचणी (General Mental Ability)
या घटकामध्ये सरासरी टक्केवारी, नफा-तोटा, काळ-काम-वेग, काळ आणि काम, बेन आकृत्या, सरळ आणि चक्रवाढ व्याज, गुणोत्तर व प्रमाण, संभाव्यता या आणि अशाच घटकांवर आधारित असतात.. मूलभूत संकल्पनांवर पकड असल्याशिवाय या घटकावर प्रभुत्व मिळवणं शक्य नाही, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. CBSC च्या इयत्ता आठवी ते दहावीच्या पुस्तकातून या घटकाचा सराव केला जाऊ शकतो. तसेच R.S. Agrwal या पुस्तकातून भरपूर सराव करणं शक्य आहे. मूलभूत संख्याज्ञान (Basic Numeracy)
या घटकामध्ये वर्गमूळ, अवयव काढणं, सरळरूप देणं, लसावि मसावि, संख्याज्ञान, पूर्णांक-अपूर्णांक, सूत्रांवर आधारित प्रश्न असे अनेक प्रश्नप्रकार आहेत. या घटकावर प्रभुत्व मिळवण्यासाठी भरपूर सरावाची गरज असते. कमी वेळात अचूक उत्तर शोधण्याचाही सराव हवा. अनेकदा सोपा प्रश्न असूनही खूप वेळखाऊ ठरल्याने त्याचा इतर प्रश्न सोडवण्यावर परिणाम होतो. अशावेळेस अशा प्रश्नांना खूण करून ठेवून शेवटी वेळ अल्यास हे प्रश्न सोडवता येतात. एकंदरीतच वेळेच्या सुयोग्य नियोजनावर हे अवलंबून आहे. मूलभूत संकल्पनांवर पकड असल्याशिवाय या घटकावर प्रभुत्व मिळवणं शक्य नाही, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. CBSC च्या इयत्ता आठवी ते दहावीच्या पुस्तकातून सराव केला जाऊ शकतो. तसेच R.S. Agrwal या पुस्तकातून भरपूर सराव करणं शक्य आहे.
CSAT Tips
• English Comprehension च्या तयारीसाठी बाजारात उपलब्ध असलेले कोणतेही सराव प्रश्न घ्या. शक्य असेल तर विविध झेरॉक्स सेंटरवरून काही निवडक क्लासेसचे सराव प्रश्नसंच घेऊन दररोज किमान 2 पॅसेज सोडवण्याचा सराव करा.
• दररोज सराव केल्यानं वाचनाचा वेग, आकलन शक्ती आणि प्रश्न सोडवण्याची गती वाढते. • हाच नियम गणितालाही लागू पडतो. तसा त्याचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे. तरीही काही घटकांवरच जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. जसे Time, Speed, Work, Distance, Calenders, Averages, Percentage इ. तेव्हा या टॉपिकची सखोल तयारी व भरपूर सराव करा. याची काठिण्यपातळी ही एमपीएससीपेक्षा कमी असते. त्यामुळे फारशी अडचण येत नाही.
• मला लहानपणापासूनच गणिताची खूप भीती वाटायची. त्यामुळे मी युपीएससीची तयारी करताना
गणिताच्या काही ठरावीक टॉपिकचीच तयारी केली व जे जमत नव्हते त्याकडे दुर्लक्ष केलं (विनाकारण
डोक्याला ताप कशाला?). मात्र English व Reasoning यांची खूप चांगली तयारी केली.
• CSAT मधील Reasoning चा किंवा बुद्धिमापन चाचणीचा भाग हा सर्वात सोपा भाग असतो. ए भाग तयारी करायला व काही सेकंदात प्रश्न सोडवायलाही सोपा आहे. अर्थात त्यासाठी Conceptual Clarity (संकल्पनात्मक स्पष्टता) व भरपूर सरावाची गरज असते.
• गणित व Reasoning साठी तुम्ही R. S. Agarwal यांची दोन्हीही पुस्तकं संदर्भासाठी वापरु शकता. याशिवाय काही टॉपिक अधिक चांगल्याप्रकारे समजावून घेण्यासाठी you tube वरील videos बघू शकता.
थोडक्यात हा पेपर फारसा अवघड नाही. थोडीशी मेहनत व सरावाने यावर मात करता येते. मात्र त्याला Lightly घेऊन चालणार नाही.
•••
5th Chapter : UPSC मी आणि तुम्ही
Reviewed by Aslam Ansari
on
June 27, 2021
Rating:
No comments: