4th CHAPTER : UPSC मी आणि तुम्ही

 

चालू घडामोडींचे महत्त्व

एक घाव तीन तुकडे


आतापर्यंत आपण प्रिलिम्स आणि मेन्सची तयारी कशी करावी, हे बघितलं. यामध्ये वारंवार चालू घडामोडींचा उल्लेख झाला. अशावेळी चालू घडामोडीचं महत्त्व काय आणि त्यांचा अभ्यास कसा करावा हा प्रश्न निर्माण होतो.

• सर्वप्रथम आपण चालू घडामोडींच्या महत्त्वाबाबत बोलूया.2016 च्या प्रिलीममध्ये खूप जणांना धक्के बसले. (तसा धक्के देत राहणे, हे UPSC चे अंगभूत वैशिष्ट्यच आहे) कारण GS-1 मध्ये विचारलेल्या 100 प्रश्नांपैकी 80 पेक्षा जास्त प्रश्नांचा संबंध हा चालू याशिवाय 2015 च्या मुख्य परीक्षेतही चारही GS पेपर्समधील बहुतांश प्रश्न हे चालू घडामोडींवर विचारलेले होते.

UPSC चा अभ्यासक्रम हा अफाट आहे. त्यामुळे कदाचित कोणत्या घटकावर प्रश्न विचारला जाणार, हे आपल्याला लक्षात येणार नाही. मात्र आपण जर मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले तर असे दिसून येते की, विचारल्या गेलेल्या बहुतांश प्रश्नांचा स्त्रोत चालू घडामोडी हा होता. मुलाखतीमध्येही चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ माझ्या मुलाखतीमध्ये मला रेपो रेटवर प्रश्न विचारला होता आणि मुलाखतीच्या काही दिवस आधीच आरबीआयने रेपो रेटमध्ये बदल केला होता.

थोडक्यात, Pre, Mains आणि Interview या तिन्ही टप्प्यांवर चालू घडामोडींना सर्वाधिक महत्त्व आहे. अपवाद वगळता UPSC त विचारले जाणारे प्रश्न हे अवकाशातून पड़त नसतात. त्यांचा कुठे ना कुठे चालू घडामोडींशी संबंध असतो. उदाहरणार्थ मुख्य परीक्षेत (2015) GS-1 मध्ये भूकंपावर प्रश्न विचारला होता. कारण नेपाळमध्ये भूकंप झाला होता. तसेच याच पेपरमध्ये, 'गांधी भारतात परत आले नसते तर घडामोडींशी होता.


आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे स्वरूप कसे असले असते ? हा प्रश्न विचारला होता कारण 2015 मध्ये गांधींना आफ्रिकेतून भारतात येऊन 100 वर्ष पूर्ण झाली होती.


याशिवाय मोसम प्रकल्प, डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटीज्, UNSC मधील भारताचे सदस्यत्व इ. अनेक चालू घडामोडींमधील घटनांना अभ्यासक्रमाशी जोडून प्रश्न विचारले गेले होते.


थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच UPSC Crack करायची आहे, त्यांना चालू घडामोडींशिवाय पर्याय नाही. त्यामुळे Newspaper वाचण्यात 3 तास जात असतील तर वाईट वाटून घेऊ नका. कारण तो तुमच्या अभ्यासाचाच महत्त्वाचा भाग आहे. 

आता आपण चालू घडामोडींचा अभ्यास कसा करायचा हे पाहूया.


प्रथमतः येथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, UPSC मध्ये चालू घडामोडींवर विचारले जाणारे प्रश्न हे Issue based असतात. त्यामुळे News मधील राजकारणाचा भाग टाळावा. उदाहरणार्थ एखाद्या राज्यात निवडणुका होणार असतील तर तेथे Congress जिंकणार की BJP अशा स्वरुपाच्या बातम्या किंवा Editorials वाचू नये. मात्र भारतातील निवडणूक प्रक्रियेतील विलंब, NOTA,


निवडणुकांदरम्यान  निर्माण होणाच्या समस्या, त्यावरील उपाय. इ. चा अभ्यास मात्र अवश्य करावा. किंवा नुकतेच अरुणाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. आता या ठिकाणी त्याची घटनात्मकता लक्षात घेणे आवश्यक असले, तरी चूक Congress ची की BJP ची, यावर जास्त वेळ वाया घालवू नका. तर कलम 356 चा Relevance काय ? ते कालबाह्य ठरत आहे. का? त्याचा दुरुपयोग कसा होत आहे का? यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिले आहेत ? तुमच्या मते यावर उपाय काय? इ. घटकांचा अभ्यास करा. तसेच Editorials मधूनही याच प्रश्नांची उत्तरे शोधा (अर्थात यासाठी बॉलर, बॅटस्मन ही Analogy समजणं गरजेचं आहे.)


यानंतर वर्तमानपत्रातून काही माहिती Publish होत असते, तिचा वापर Prelims साठी होतो. म्हणून केवळ माहिती जमवण्यासाठी वेगळ्या Notes काढा.


उदाहरणार्थ - World Bank च्या नुकत्याच प्रकाशित Ease of Doing Business या Report मध्ये 'भारताचे स्थान 130 वे अशी बातमी असेल तर Pre साठी 'Ease of Doing Business Report कोण प्रकाशित करतो? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर 'भारत सरकारने वारंवार विविध मार्गांनी प्रयत्न करुनही भारताचे या यादीतील स्थान कमी का आहे? हे स्थान उंचावण्यासाठी काय उपाय करता येतील?' असा प्रश्न Mains मध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे Current Affairs. चा अभ्यास करताना हे दोन्ही Approach ठेवा.

> अर्थात हे समजण्यासाठी Syllabus व मागील वर्षांच्या प्रश्नांचे Analysis करा. 


> Paper वाचताना याचा आपल्याला GST, II, II, IV. Psay, Optional पैकी कशाला उपयोग होणार आहे? हा प्रश्न मनात ठेवा आणि त्याच दृष्टीने त्याचे वाचन करा.


> दररोज साधारणपणे 2-3 तास चालू घडामोडींचा अभ्यास करा. अर्थात, काही महिन्यांनी हा कालावधी एक दीड तासापर्यंत कमी करता येतो.


> कोणतीही वादग्रस्त बातमी, Gossips, पूर्णत: राजकीय, फिल्मी बातमी Skip करा. UPSC ला प्रशासक निवडायचे आहे, राजकारणी नाही हे लक्षात घ्या.


> तुम्हाला तुमच्या Notes सहजपणे Revise करता अशापद्धतीने Short करा. म्हणजेच तुमच्या Notes या विषयनिहाय व त्या विषयातील Topic निहाय काढा. वही ऐवजी सुट्या पानांवरती Notes काढा, जेणेकरून पुढे त्या सहज Update करता येईल.


> वर्तमानपत्रातील आशय अपुरा बाटत असल्यास संबंधित टॉपिकचा अभ्यास इंटरनेटवरुन करा. ॐ वर्तमानपत्रातील नोट्स काढण्याचे काम पुढे ढकलू नका. त्याचवेळी नोट्स काढा.


> वर्तमानपत्रातील कात्रणे कधीही काढू नका. त्यांची रिव्हीजन कधीच होत नाही. (माझाही असाच अनुभव होता). 


> वर्तमानपत्री भाषेत नोट्स काढू नका. तुमच्या नोट्स या तुमच्याच भाषेत काढा. यासाठी आधी लेख वाचा, त्यातील महत्त्वाच्या भागास अधोरेखित करा. त्यानंतर त्या भागाचे पुनर्वाचन करा व त्यातून तुम्हाला जे काही समजले ते तुमच्या भाषेत लिहून काढा.


> नोट्स काढताना 3-4 रंगाचे पेन वापरा.


> लेख वाचून फक्त त्याच्या नोट्स काढू नका, तर त्यावर विचार करा आणि त्यातून तुम्हाला


> सुचणारे तुमचे विचारही लिहा.


> नोट्समधील मुद्द्यांना शक्यतो 1,2,3 असे क्रमांक द्या.


> संपादकीय पानावर वाचकांच्या प्रतिक्रिया' नावाचे सदर येते. ती सर्व पत्रे दररोज वाचा. यातून संबंधित विषयावर तुमची पकड येऊन तुमचे स्वतःचे मत तयार होईल. ॐ पुस्तकात उदाहरणादाखल माझ्या काही नोट्स दिल्या आहेत.


> कोणत्याही ज्वलंत विषयासंदर्भात अध्ययन करताना त्या समस्येचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध परिप्रेक्ष्यातून विचार करा.


> एका डायरीमध्ये विषयनिहाय चालू घडामोडी ज्वलंत विषयांची एक यादी बनवा. ही यादीच तुम्हाला प्रिलिम्सनंतर मेन्ससाठी काय काय वाचायचे आहे याची आठवण करून देईल.


> मॅगझिनमधून वाचलेल्या बाबींमधील जे मुद्दे वर्तमानपत्रातून मिळाले नसतील, त्यांचीदेखील त्या त्या विषयाच्या टॉपिकच्या नोट्समध्ये भर घाला. 

> आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नोट्सची वारंवार रिव्हिजन करा.


> नोट्स या शक्यतो शॉर्ट असाव्यात.


> पूर्ण वाक्य लिहिण्याची गरज नाही. मोजक्याच शब्दात नोट्स काढा.


> दुसऱ्या कोणाच्या नोट्स मिळविण्यासाठी धडपडू नका. स्वतःच्या नोट्स स्वतः काढा. > नोट्स बनवण्याची कोणतीही पद्धत सर्वश्रेष्ठ नाही. त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे योग्य ती पद्धत निवडा किंवा स्वतःच्या पद्धतीचा शोध घ्या.


> शॉर्ट नोट्स कशा काढाव्यात, यासाठी mrunal.org या website वरील चालू घडामोडींच्या नोट्स पाहा.

•••

4th CHAPTER : UPSC मी आणि तुम्ही 4th CHAPTER : UPSC मी आणि तुम्ही Reviewed by Aslam Ansari on June 25, 2021 Rating: 5

2 comments:

Powered by Blogger.