3rd CHAPTER : UPSC मी आणि तुम्ही

यूपीएससी, - माझा दृषटिकोन

कष्ट करणार, त्याला UPSC देणार

 स्वप्न!! आपण किती स्वप्नं बघतो! काही पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्नही करतो. स्वप्नं आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत. नेहमीच काही ना काही करण्यासाठी प्रेरित करतात. मग तो सैराटमधला परशा असो किंवा फॅन्ड्रीमधला जब्या किंवा Mcdonalds च्या दुकानाबाहेर काचेच्या भिंतीतून जीभ ओठाला लावून बघणारा गरीब, छोटासा, अनवाणी मुलगा. प्रत्येकाचं काहीना काही स्वप्न! माझंही आणि तुमचंही. माझी काही पूर्ण झालीत, काही नाही झालीत, काही होतील. मात्र ही स्वप्नंच मला काही ना काही करत राहायला, जगायला शिकवतात. तुमच्यासोबतही असे होत असेल.


आता, हे पुस्तक लिहिण्याचे स्वप्नच बघा ना. मला कधीही एखाद्या यशस्वी अधिकाच्याकडून तयारीविषयी मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे मी हे स्वप्न बघितले की, जे मला मिळाले नाही ते इतरांना तरी मिळावे. असं नाही की, हे पुस्तक वाचल्याने तुम्हाला तुमचे यश खात्रीशीरपणे मिळेल, पण त्या यशाकडे जाणाऱ्या अंधकारमय व काटेरी रस्त्याचा मार्ग काही अंशी प्रकाशमय व सुकर होईल. माझ्यासारखंच जे स्वप्न तुम्हीही बघत आहात, ते पूर्ण होवो...


UPSC च्या 3 वर्षांच्या तयारीने मला खूप काही दिले आहे. पुण्यात तयारी करत असतानाही खूप काही शिकायला मिळाले. पुण्यातील पेठांमध्ये अहोरात्र तयारी करणारे अनेक विद्यार्थीही बघितले. मला मिळालेल्या यशानंतर अर्थातच मी खूप आनंदित होतो आणि आहे. आयुष्यात ज्या सुखांनी कधीच तोंड दाखवले नव्हते, ती सगळीच मिळत आहेत. माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या पालक, मित्र व शिक्षक यांचेही स्वप्न पूर्ण झाले. मात्र Result लागून काही दिवस झाल्यानंतर अनेक वर्षांपासून तयारी करणाऱ्या, मात्र यशस्वी न झालेल्या उमेदवारांचा विचार माझ्या मनात आला. वाईट वाटते खूप आणि आश्चर्यही होते. मी असे अनेक लोक बघितले जे माझ्यापेक्षा जास्त हुशार, मेहनती व अनुभवी


होते. काही जण असेही होते, ज्यांनी मला शिकवले होते. मात्र त्यांच्या या परीक्षेतील अपयशामागील कारणे कोणती हे मला माहीत नाही. पण त्यांच्याविषयी माझ्या मनात अतिशय आदर आहे.


अशावेळी, माझ्या या यशामागील  माझा UPSC कडे बघण्याचा जो दृष्टिकोन  होता, त्याबद्दल  बोलणे  अत्यावश्यक   वाटते.


UPSC या विश्वामध्ये तयारी करणाऱ्या धडपडणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांपैकीच मीदेखील एक होतो आणि तयारी करताना प्रत्येक Serious Aspirant ला जे काही Problems बेतात से सर्व मलाही यायचे. माझ्या गरिबीने व घरातील अशांत वातावरणाने त्यात अधिकच भर घातली होती. तयारीच्या पहिल्या वर्षी या सर्व गोष्टींचा खूप त्रास झाला. बी.ए. च्या प्रथम वर्षात एकदा माझ्या फर्ग्युसन कॉलेजमधून बाहेर पडून Main gate घरून सरळ चालत गेलो. तेथे द युनिक अॅकॅडमीची जुनी Building व Library होती. घाबरत घाबरत तेथील चहाच्या टपरीवर चहा घेतला व Unique च्या Building कडे पाहत बसलो. काही वेळानंतर कोणीतरी एक भलं मोठं पुस्तक घेऊन Library तून बाहेर पडलं. त्यांना बघून मला अजूनच भीती वाटली. एवढी सगळी तयारी करणारी लोक, मोठमोठे Classes, त्यात शिकणारी मुलं, Library, स्पर्धा इ. ची भयंकर भीती वाटली आणि सरळ तेथून चालता झालो. बोंबलायला, दुसरं करणार तरी काय ?


पण नंतर हळूहळू या क्षेत्रातील बास्तविकता कळू लागली. पुण्यात जम बसला, मित्र झाले, युनिक अॅकॅडमीच्या जुलै, 2013 च्या इंटिग्रेटेड बॅचला प्रवेश घेतला आणि मग माझा खऱ्या अर्थाने UPSC शी संघर्ष सुरू झाला. अर्थात, मोठ्या जोमाने तयारी करण्यासाठी मला मानसिक शांततेची खूप गरज होती. घरामध्ये दररोज आई-वडिलांचे काही ना काही कारणाने भांडण होत असे आणि त्याचा माझ्या मनावर बालपणापासून विपरीत परिणाम होत होता. पण आता काही झालं तरी याचा परिणाम स्वतःवर अजिबात होऊ द्यायचा नाही, अशी मनाशी खूणगाठ बांधली. बोंबलायला, असंही आपण Tension घेतल्याने हा प्रश्न काही सुटणार नव्हताच! मग ज्या गोष्टी आपल्या हातात नाही, त्यावर कशाला एवढा विचार करायचा? बस्स, मग आता ठरल, याचा फारसा विचार करायचा नाही. आपण आपली तयारी करत राहायची.


एकदा वडिलांचा Call आला. थोडंसं formal बोलायचो मी वडिलांशी. तेवढं झाल्यानंतर घरातील कुजबुजी सांगायला सुरुवात झाली. माझ्या मनाची खूणगाठ मला सतत व्यक्त व्हायला सांगत होती. शेवटी सांगून टाकलं, "यार, बस करो। थक गया हूँ मैं आप लोगोंकी इन बातों से अब मुझे शांती से जीने दो, पढने दो। आप लोगो को जो करना है करो, मगर मुझे कुछ मत बताओ। ऐसी बाते सुनकर मुझे तकलीफ होती है। मैं पढ़ना चाहता हूँ सुकून से आजसे मुझे घरकी कोई बात मत बताना।"


हे सगळ मी जरासं रागानेच बोललो होतो. पण हे गरजेचं होतं. माझ्या आई-वडिलांनाही ते पटल, त्यानंतर त्यांनी कधीच मला घरातील समस्या सांगितल्या नाहीत. एवढं की एकदा वडिलांची रिक्षा उलटली व वडिलांच्या पायांना मार लागला, तरीही या गोष्टीची मला खबर लागली नाही. आमचे जिजू सरकारी दवाखान्यात शेवटचा श्वास घेत होते आणि मी शांतपणे Interview ची तयारी करत होतो! हे थोडं जास्तच झालं, पण पर्याय नव्हता. या सर्व त्यागांचा परिणाम आपल्यासमोर आहे.


UPSC ची तयारी करताना तुमच्या मनात कोणतीही अशांतता असता कामा नये. अन्यथा समोर पुस्तक ठेवलेले असते व मन मात्र त्या समस्यांमध्येच गुंतलेले असते. तयारीच्या काळात विविध कारणांनी अस्वस्थ झालेले विद्यार्थी मी बघितले. चहा पिताना दुसरा विद्यार्थी काहीतरी बोलला तर पहिला परत येऊन स्वतःशीच बडबडायचा, 'आईला, तो असा बोललाच कसं काय? थांब नंतर दाखवतो त्याला', 'मी हे बोलायला पाहिजे होतं यार' इत्यादी इत्यादी. तुमच्या मनावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या अशा घटना, व्यक्ती, वातावरण यांपासून दूर राहा आणि शांत मनाने तयारी करा. बऱ्याचदा Coaching Class मधील घटना तुम्हाला बेचैन करतात. Class मधील एखादा विद्यार्थी वारंवार प्रश्न विचारतो, प्रश्नांची उत्तरे देतो, हे करण्यात तुम्ही अपयशी ठरता. मग Class मधील सर्वात सुंदर व तुम्हालाही आवडणारी मुलगी त्या मुलाशी मैत्री करते! झालं संपलं इथंच. मग सुरु होतं एक वेगळंच चक्र. एकेकाळी वर्गातील सर्वांत हुशार विद्यार्थी असणारे तुम्ही आता स्वतःच्या Intellegence वर शंका घेऊ


लागता. UPSC च्या या लढाईत तुमचे खच्चीकरण करण्यासाठी एवढं पुरेसं असतं. त्यामुळे लवकर यातून


सावरा आणि नव्या जोमाने तयारीला लागा. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे If you do what you always did,


you will get what you always got.


माझ्या तयारीतील दुसरा महत्त्वाचा पैलू होता, वेळेचा सदुपयोग माझ्या वडिलांनी मला 3 वर्षांचा बेळ दिला होता. या वेळेत मला पुण्यातील BA चं शिक्षण आणि UPSC ची तयारीही करायची होती. ३ वर्षांच्या पुढे शिक्षण घेणे मला परवडणारही नव्हते. माझ्यामुळे माझ्या पालकांवर जास्तीचे आर्थिक ओझेही मला नको होते.


थोडक्यात, मला Failure Affordable नव्हतं. त्यामुळे एक मिनिटही कोठे वाया गेला तर राग यायचा, बाईट वाटायचं. एका दिवसाचे अभ्यासाचे Target पूर्ण झाले नाही तर Guilty वाटायचं; पूर्ण रात्र अस्वस्थ व्हायचं. अर्थात मी पूर्णवेळ फक्त अभ्यास करत नव्हतो. आठवड्यातून मी किमान 2 चित्रपट बघायचो, कधी कधी मित्रांसोबत बाहेर जेवायला जायची. मात्र त्याव्यतिरिक्त फक्त अभ्यासच करायचो. थोडक्यात, ज्यावेळी जे करायचं, तेच करायचं, अशी माझी पद्धत होती. यामुळे मी जास्त मित्रही बनवत नव्हतो. सुरुवातीला अशा शिस्तीचा त्रास होतो. मनात वारंवार उठून जाण्याचा, चहा घेण्याचा, गप्पा मारण्याचा मोह होतो, मात्र त्यावर प्रयत्नपूर्वक Control करता येतं. मीही तेच केलं. अर्थात Exceptionally माझाही कधी कधी Timepass व्हायचा, मात्र मग रात्री जास्त अभ्यास करून मी तो भरून काढायचो.


अर्थात, ज्या विद्यार्थ्यांना वारंवार  UPSC मध्ये अपयश  आले किंवा ज्यांची 'माझा अभ्यासच होत नाही' अशी समस्या असते, त्यांनी आत्मपरीक्षण नक्की करावे. आपण कितीला उठतो, तयार होतो, Library त पोहोचतो, अभ्यास करतो, Timepass करतो, चहा वगैरे होतो, गप्पा मारतो इ. चा विचार  करा आणि प्रयत्नपूर्वक  Timepass किंवा वाया जाणारा वेळ कमी करा. थोडा त्रास होईल, मात्र नंतर तुम्हालाच स्वतःचं कौतुक वाटेल, समाधान वाटेल आणि तुमचा Confidence ही बाढेल.


तुम्हाला उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक मिनिटाचा पुरेपूर वापर करा. माझ्या Hostel पासून (गोखलेनगर) Unique ची बालगंधर्व Branch 3-4 km होती. मी सायकलने तेथे जात असे, पोहोचण्यासाठी 15-20 मिनिटे लागायची, तेव्हा मी कानामध्ये Headphones घालून मागच्या Lectures ची Recordings ऐकायचो! तुम्ही सदुपयोग केलेल्या एकेका मिनिटाचा फायदा तुम्हाला प्रत्यक्ष Examination Hall मध्ये नक्की होईल, मलाही झाला.


माझ्या यशातील तिसरा पैलू होता माझा सकारात्मक दृष्टिकोन व आत्मविश्वास अभ्यासाला एक ठरावीक व योग्य दिशा मिळाल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला होता. याशिवाय UPSC च्या प्रत्येक 

Stage ची मी भरपूर तयारी व सराव केला होता, त्याचा मला फायदाच झाला.


तसं माझ्या आयुष्यात नकारात्मक परिणाम घडवणाऱ्या गोष्टी खूप होत्या. माझं कच्चं असणारं English व गणित, माझी गरिबी, मित्रांचा तुटवडा, Stationary ची कमतरता इ. या गोष्टींचा माझ्या मनावर सुरुवातीला नकारात्मक परिणाम व्हायचा.


FYBA नंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्यातच Job करायचो. सायकलीवरून टिळक रोडवरून येताना झगमगणारी कपड्यांची दुकाने पाहात राहावीशी वाटायची. मला कुठलेही व्यसन नव्हते व नाही, मात्र दुकानातील कपड्यांचे व्यसन होते. त्यामुळे मी कपड्यांना न्याहाळत बसायचो. पण घ्यायची कथी हिंमत झाली नाही. पुढे प्रभात रोडवर एक हापूस आंब्याचे दुकान होतं.


मला आंबे खायला खूप आवडत. पहिली Sulary मिळाली की नक्की घेईन, असा विचार होता. अर्थात काहीच नाही झालं. माझी सर्व Salary मी के सागरच्या Book Stall वर खर्च केली! मेहनतीने कमावलेले सर्व पैसे पुस्तकांवर खर्च झाले. म्हणून वाईट वाटले नाही, उलट आत्मविश्वास वाढला की राव आपल्याकडे अभ्यासाला किती पुस्तके आहेत! हळूहळू का होईना पण सकारात्मक राहायला शिकलो होतो. याचा मला माझ्या Interview लाही खूप फायदा झाला. कारण 9 फेब्रुवारीला माझ्या जिजूंचे निधन झालं, 19 फेब्रुवारीला Mains चा Result आला व 28 फेब्रुवारीला मी तयारीसाठी दिल्लीत दाखल झालो व 7 एप्रिलला माझा Interview झाला.


जिजूंच्या निधनाने माझ्या कुटुंबावर मोठे संकट ओढावले होते. मात्र तरीही माझ्याकडे Positive राहण्याशिवाय पर्याय नव्हता. एका Mock Interview च्या शेवटी मला Panel ने विचारल की, 'तू एवढा हसतमुख कसा राहू शकतोस? एवढं हास्य येतं कोठून? याचा तुला मुलाखतीत खूप फायदा होणार'. (आणि तो झालाही)


एकीकडे विद्यार्थी Pre चा अभ्यास करत होते, तर मी Pre च्या एक दिवस आधी मित्रांसोबत अजय


देवगणचा Drishyam बघत होतो. तशी ही छोटीशी गोष्ट वाटेल, पण तयारी करणाऱ्यांना या गोष्टीचं महत्त्व पटेल.


थोडक्यात, परीक्षेची तयारी करताना नेहमी Confident and Positive राहा. स्वतःशी स्पर्धा करा.


दुसऱ्याचं काय चाललंय? किती अभ्यास झाला यापेक्षा स्वतःच्या तयारीवर लक्ष द्या. तयारी करताना इतरांच्या मागे धावू नका. स्वतःच्या speed ने तयारी करा. मीही माझा अभ्यास माझ्या पद्धतीने केला होता. कोण काय करतंय? कोणाचा किती अभ्यास झालाय? याच्याशी मला देणं-घेणं नव्हतं. माझी पद्धत कोणाला हास्यास्पद वाटली तरी चालेल, मात्र मी माझ्या मनाप्रमाणेच अभ्यास करीन, असा निर्धार मी केला होता.


थोडक्यात, तुमच्या अभ्यासाचे Customization करा. कोणालाही Follow करू नका. (उदा. Mains च्या वेळी सर्वजण Unique मध्ये जाऊन Test Series देत होते. मला माहीत होतं की आपल्याला घड लिहिता येत नाही व आपला फारसा अभ्यास व Revision ही नाही. जर मी देखील इतराप्रमाणे वर्गात जाऊन Test Series देत बसलो असतो तर मला मिळालेल्या कमी Marks मुळे माझा Confidence


कमी झाला असता.) म्हणून मी ठरवलं की आपण आधी Writing Skill Develop करू, थोडासा जास्त अभ्यास करू व मगच उत्तर सोडवू. आणि मी तेच केलं. माझ्या Speed ने व तयारीला लक्षात घेऊन मी प्रश्नपत्रिका सोडवल्या, त्याचा मला खूप फायदा झाला. मी सर्व विषयांवरील अपेक्षित उत्तरे ठरलेल्या नियोजनाप्रमाणे दर आठवड्याला युनिकमध्ये Submit करत असे. त्यावर आलेला Feedback लक्षात घेऊन पुढील तयारी आखायचो. निबंध, Ethics वरील प्रश्नोत्तरे युनिकमधील 3-4 शिक्षकांकडून तपासून घेत असे. एकाच बाबीवर मिळालेल्या विविध स्वरूपाच्या सूचनांचा प्रचंड फायदा झाला. त्यामुळे तुम्हीही स्वतःच्या अभ्यासाला Customise करा, Flow सोबत जाऊ नका आणि शेवटी हेच सांगेन की ध्येयवेडे व्हा. तुम्ही जे काही स्वप्न पाहिलं आहे. ध्येय ठेवलं आहे, त्यामागे वेड्याप्रमाणे धावा. सगळीकडे तुम्हाला फक्त तुमचे ध्येयच दिसलं पाहिजे. किंबहुना तुम्हाला स्वप्नही तुमच्या ध्येयाचंच पडायला हवं. एक-दोन वर्षांसाठी सर्व काही विसरून जा. याचा तुम्हाला त्रास होईल. अनेक संकटे येतील, सर्वकाही सोडून द्यावसं वाटेल, कधी-कधी पुस्तके फेकून द्यावीशीही वाटतील. परंतु अशावेळी आपल्या ध्येयाला विसरू नका. आयुष्यात काही वाईट घडलं तरी त्यातून सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्या ध्येयाकडे चालत राहा, त्याशिवाय पर्याय नाही. एका कवीने आपल्या ध्येयासक्तीला पुढीलप्रमाणे व्यक्त केलं आहे: 'पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती, होऊनिया बेहोश घावलो ध्येयपथावरती. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूपखूप सदा सर्वकाळ शुभेच्छा !


3rd CHAPTER : UPSC मी आणि तुम्ही 3rd CHAPTER : UPSC मी आणि तुम्ही Reviewed by Aslam Ansari on June 16, 2021 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.